कोल्हापूर

बोलोली जलजीवन पाणीयोजनेचे काम निकृष्ट

CD

04988
बोलोली पाणी योजनेचे काम निकृष्ट
जलजीवन मिशनमधून १ कोटी ८ लाखाची योजना

सकाळ वृत्तसेवा

सांगरुळ; ता. ११ : बोलोली (ता. करवीर) येथील जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले आहे. दोन वर्षं झाले तरी योजनेतून पाणी मिळालेले नाही. पाणीपुरवठा योजनेचे काम संबंधित ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे. काही ठिकाणी पाईप उघड्यावर टाकली आहे. या कामाची चौकशी व्हावी; अशी मागणी होत आहे.
बोलोली सुमारे साडेचार हजार लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे. वाड्या-वस्त्यांवरील नागरिक सध्या पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून जलजीवन मिशन २०२२-२३ च्या माध्यमातून बोलोलीपैकी कारंडेवाडीत १ कोटी ८ लाख ८२ हजार रुपयांची पाणी योजना मंजूर झाली. माणसी ५५ लिटर ग्रामीण निकष या योजनेचा आहे. या योजनेतून उपवडे तलावातील पाणी स्वयंभूवाडीजवळ विहिरीत सोडले आहे. तेथून चार वाड्यांना पाणी पुरवले जाईल. मुख्य वाहिन्या टाकण्याचे काम वर्षभरापूर्वीच पूर्ण झाले. मात्र त्यानंतर काम खोळंबले आहे. अंतिम टप्प्यातच वीजजोडणीसाठी महावितरणने परवानगी दिली नसल्याने काम रखडले आहे. आराखड्यानुसार दोन संप मंजूर आहेत. मात्र एकाच संपामधून दोन-तीन वस्तींना पाणीपुरवठा होत आहे.
या योजनेतून पाणी सुरू करताना टाईप उपसून येतात. मंजूर आराखड्यानुसार काही अंतर पाईप टाकली तर उर्वरित पाईप हलक्या दर्जाची आहे. चाचणी घेतानाच अनेक ठिकाणी पाइपला गळती लागली. शेतातून टाकलेली पाईप नियमानुसार जमिनीत खोलवर टाकलेली नाही. ग्रामस्थ व सदस्यांनी याबाबत ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे तोंडी तक्रार केली मात्र ग्रामस्थांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या आहेत. प्रशासनाने चौकशी करावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

महावितरणची आडकाठी ....
ग्रामपंचायतीने पाण्याचे थकीत वीज बिल भरले नसल्याने महावितरणकडून परवाना दिला जात नाही. थकीत बिल भरल्यानंतरच परवानगी मिळेल, अशी आडकाठी महावितरणची आहे. ग्रामपंचायतीने थकीत काही रक्कम भरली आहे. मात्र अद्याप योजनेसाठी महावितरणकडून परवानगी मिळालेली नाही.

कोट

काम व्यवस्थित पूर्ण झाले पाहिजे. आता काम पूर्ण नाही झाले तर लिकेज राहणार व पाण्याचा प्रश्न कायमचा राहणार आहे.
- शिवाजी बाटे, ग्रामपंचायत सदस्य

योजनेत पाचशे फुटांचा हेड आहे. यामुळे मागे पाईप उपसून येतात. कंत्राटदारांनी पुन्हा दुरुस्त करून देतो म्हणून सांगितले आहे.
- पौर्णिमा कांबळे, सरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT