कोल्हापूर

पत्रकार बैठक,करवीर महोत्सवात खेळ पैठणीच्या विजेत्या महिलेला एक लाखाची पैठणी - संताजी घोरपडे

CD

करवीर महोत्सवात खेळ पैठणीच्या
विजेत्यास एक लाखाची पैठणी

संताजी घोरपडे ; ७ ते १० जूनअखेर वाकरेत होणार

कुडित्रे, ता. ६ : महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी करवीर महोत्सवांमध्ये विविध उपक्रम होणार आहेत. यातीलच ‘एक खेळ पैठणीचा’ या पक्रमात विजेत्या महिलेला एक लाखाची पैठणी बक्षीस देण्यात येणार असल्याचे व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांनी सांगितले. ७ ते १० जून असे चार दिवस वाकरे फाटा येथे हा द्वितीय वर्षाचा करवीर महोत्सव होईल.
घोरपडे म्हणाले, ‘दहा एकर भव्य प्रांगणात होणाऱ्या करवीर महोत्सवात महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी मोफत स्टॉल दिले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांसह करमणुकीचे कार्यक्रम, लहान मुलांसाठी फनफेअर, झिम्मा-फुगडी, खेळ पैठणीचा, वेशभूषा, नृत्य आदी स्पर्धांसह लघुनाटकांबरोबर विठ्ठल तात्यासाहेब वासकर महाराज यांचे कीर्तन, विजयालक्ष्मी शिरगावकर यांचे प्रवचन प्रवचन व जागर असे धार्मिक कार्यक्रमही होतील. तरुणींसाठी रांगोळी, मेंदी, कुकिंग, रेकॉर्ड डान्स स्पर्धा होतील. महिलांनी करवीर महोत्सवात सहभाग नोंदवून आनंद व व्यवसायवृद्धी करावी, असे आवाहन संताजी घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी डॉ. संगीता निंबाळकर, हिंदूराव पाटील, शिवाजी तोडकर, संदीप पाटील, बाबासाहेब पाटील, धनाजी चुयेकर, अनिल पाटील, युवराज पाटील, बाळासाहेब पाटील, तानाजी वातकर उपस्थित होते. प्रा. ए. डी. पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sonsने चंद्रशेखरन यांना निवडलं, पण टाटा ट्रस्ट्सचा विरोध! नोएल टाटाच खरे किंगमेकर? टाटामध्ये चेअरमनची निवड कशी होते?

आम्ही कुठे जायचं? न्यायाधीशाचा प्रश्न; ५ महिन्यात २३ जणांना फाशीची शिक्षा, आता ९७ गंभीर खटले ट्रान्सफर होताच संतापले

गर्दीतून जात होती सलमान खानची कार, ड्रायव्हरच्या चूकीमुळे भाईजान चिडला, चालकाला जोरात मारलं अन्... Viral Video

Insulin Resistance Symptoms: डायबेटीस होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; असं ओळखा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही!

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

SCROLL FOR NEXT