कोल्हापूर

भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी करवीर महोत्सवाचे आयोजन - संताजी घोरपडे

CD

05106

भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी
करवीर महोत्सवाचे आयोजन

संताजी घोरपडे; चार दिवस विविध कार्यक्रम

कुडित्रे, ता. ८ : समाजातील गरजू लोकांना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय मदत देण्याची गरज आहे. स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांचा आदर्श व वारसा घेऊन महिला सबलीकरण करण्याचे मोठे काम करवीर महोत्सवातून होत आहे, असे व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष संताजी घोरपडे यांनी सांगितले.
वाकरे (ता. करवीर) येथे व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करवीर महोत्सव २०२४ चा प्रारंभ राष्ट्रीय स्वराज्य संघाचे मुकुंद भावे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. याप्रसंगी घोरपडे बोलत होते. यावेळी संताजी घोरपडे, डॉ. संगीता निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. संताजी घोरपडे म्हणाले, ‘ग्रामीण महिलांतील कलागुण दडपण आणि अशिक्षितपणामुळे दबले जातात. महोत्सवात युवती, महिलांनी निःसंकोचपणे कलागुण प्रदर्शित करावेत.’ भाजप महिला अध्यक्ष रुपाराणी निकम म्हणाल्या, ‘‘निःस्वार्थीपणे संताजी घोरपडे यांनी समाज एकत्र करून बंधूभाव जोपासण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.’ प्रधान पाटील म्हणाले, ‘‘लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवातून हिंदू संस्कृती जागृत केली, तर संताजी घोरपडे यांनी करवीर महोत्सवातून महिला सशक्तीकरणाचे काम केले.’ यावेळी बेलेच्या सरपंच नाजुका पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कुडित्रे सरपंच ज्योत्स्ना पाटील, वाकरे सरपंच अश्विनी पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय कार्यकारिणी सदस्य मुकुंदजी भावे, अनिरुद्ध कोल्हापुरे, संग्राम निकम, महिला जिल्हाध्यक्ष रुपाराणी निकम, तालुकाध्यक्ष सुशीला पाटील व करवीर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

Vadhavan Highway Project : वाढवण महामार्गाचे केवळ 16 टक्केच काम पूर्ण; जमीन संपादनात नेमके अडथळे काय? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT