कोल्हापूर

संजय गांधी ,श्रावणबाळ पेन्शन योजनेचे पैसे आता डायरेक्ट बँकेत होणार ट्रान्सफर

CD

‘संजय गांधी, श्रावणबाळ’चे पैसे थेट बँकेत ट्रान्‍स्‍फर

जून १३ डेटलाईन; जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांची खाती होणार अपडेट

कुंडलिक पाटील ः सकाळ वृत्तसेवा

कुडित्रे, ता. ६ : संजय गांधी, श्रावणबाळ व सर्व पेन्शन योजनांचे पैसे बँक कामकाजामुळे वेळेवर मिळत नव्हते. ही वेळखाऊ पद्धत बंद होणार आहे. शासनाकडून लाभार्थ्यांच्या थेट बँकेतील खात्यात, पेन्शन योजनेचा लाभ देण्यात येणार असून वेळेत व डायरेक्ट पैसे बँक ट्रान्‍स्‍फर होणार आहे. त्यामुळे पैसे बँकेत खात्यावर आले का हे पाहण्यासाठी होणारे हेलपाटे बंद होणार आहेत. या प्रणालीमध्ये ४४ हजार लाभार्थ्यांची खाती अपडेट केली आहेत. उर्वरित ऑनलाईन कामकाज १३ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जिल्हाधिकारी कार्यालय महसूल यंत्रणेने ठेवले आहे.

जिल्ह्यात संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, इंदिरा गांधी अशा विविध पेन्शन योजना सुरू आहेत. यामध्ये जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेमध्ये ६७ हजार तर श्रावणबाळ योजनेमध्ये ७८ हजार लाभार्थी आहेत. यापूर्वी राज्य शासनाकडून जिल्हाधिकारी यानंतर तहसीलदार यानंतर बँकेत अशा टप्प्यामध्ये पैसे दिले जात होते. यामुळे लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळत नव्हते आणि बँकेत लाभार्थी हेलपाटे मारत होते. यानंतर राज्यभरात डायरेक्ट बँक ट्रान्‍स्‍फर (डीबीटी) प्रणाली सुरू केली आहे. यामध्ये राज्य शासनाकडून थेट अनुदान लाभार्थ्याच्या बँक खात्यावर ट्रान्‍स्‍‍फर होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात युद्धपातळीवर डायरेक्ट बँकेत अनुदान ट्रान्‍स्‍फर करण्यासाठी काम सुरू आहे. डीबीटी पोर्टलवर माहिती भरण्यास कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. वयस्कर लाभार्थ्यांचे मोबाईल नंबर नाहीत, अशावेळी घरातील कोणाचाही मोबाईल नंबर बँकेमध्ये लिंक करावा लागणार आहे. आवश्यक माहिती तलाठी यांच्याकडे लाभार्थ्यांनी द्यावी, असे आवाहन संजय गांधी तहसीलदार करवीर विजय जाधव यांनी केले आहे.

चौकट
एका क्लिकवर लाभ
आजपर्यंत संजय गांधी योजनेत २२.९९३, ‘श्रावणबाळ’मध्ये २१ हजार लाभार्थ्यांचे काम अपडेट झाले आहे. १३ जूनपर्यंत सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते चेक करून कॉमन डेटाबेस तयार केला जाणार आहे. यामुळे एका क्लिकमध्ये वेळेवर लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.


कोट
संजय गांधी, श्रावणबाळ पेन्शन योजनेमध्ये लाभार्थ्यांचा कॉमन डेटाबेस होणार आहे. पेन्शन योजनेचा लाभ डायरेक्ट बँक खात्यावर ट्रान्‍स्‍फर होणार आहे. १३ जूनपर्यंत सर्व कामकाज पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
- डॉ. संपत खिलारी, उपजिल्हाधिकारी महसूल,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W Hockey: ४४ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! चीनला फायनलमध्ये हरवत भारताचा गोल्डवर कब्जा; थेट ऑलिम्पिकचं तिकीटही मिळवलं

Tukaram Mundhe Election Commissioner : तुकाराम मुंढे निवडणूक आयुक्त होणार? मुंबईच्या आंदोलनात कोणी केली मागणी

Electric Vehicle Policy: सरकारी योजना! इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची सवलत; काय आहे नवीन स्कीम?

Latest Marathi News Live Update : जेलमध्ये टाकलं तर… अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन

Dive Agar Incident : 'चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून पाण्यात गेलो नाही आणि वाचलो'; प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याची व्यथा

SCROLL FOR NEXT