कोल्हापूर

गव्याने मारलेल्या शेतकऱ्याला पाच लाखाची मदत, अनुस्कुरा येथील शेतकरी

CD

05450
अनुस्कुरा : येथे शेतकरी गणेश लाड यांना मदतीचा पाच लाखांचा धनादेश देताना जी. गुरुप्रसाद, दीपक पाटील, मनोहर पाटील, विजय पाटील, बाजीराव सुळेकर, आदी.

जंगलाचे रक्षण प्रत्येकाचे
करावे : जी. गुरुप्रसाद
गव्याच्या हल्ल्यात जखमी शेतकऱ्यास पाच लाख मदत
शाहूवाडी, ता. १५ : जंगल ही राष्ट्रीय संपत्ती असून, त्याचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे काम आहे, असे मत उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी व्यक्त केले.
अनुस्कुरा (ता. शाहूवाडी) येथील शेतकरी नामदेव लाड गव्याच्या हल्ल्यात मोठी दुखापत झाली होती, त्यांना वन खात्यातर्फे पाच लाखांची मदत देण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पोलिसपाटील मनोहर पाटील म्हणाले, ‘‘पाच लाख रुपये मदतीने एखाद्या कुटुंबाची झालेली हानी भरून निघणार नाही, परंतु वन खात्याने केलेली ही मदत त्या कुटुंबाला आधार ठरेल.’’ वन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून, भविष्यात शेती उद्‍ध्वस्त होईल, अशी खंत विजय पाटील यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमा प्रसंगी विविध शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे वनक्षेत्रपाल सुषमा जाधव यांनी दिली. जंगलात वेलवर्गीय झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली असून, त्यावर काय उपाययोजना करता येईल, याचे संशोधन सुरू आहे, असेही सांगण्यात आले.
उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद आणि कोल्हापूरचे सहायक वन संरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव आणि पांडुरंग बुवा यांच्या प्रयत्नाने अपघातग्रस्त शेतकरी लाड यांना धनादेश देण्यात आला.
यावेळी अणुस्कुराचे उपसरपंच दीपक पाटील, बाजीराव सुळेकर, विष्णू बागवे, वसंत पाटील, वनरक्षक नितीन नलावडे, ज्ञानेश्‍वर शिंदे, गोविंद शेळके, सुरेश पाटील, सुभाष पाटील, संदीप कदम, बळीराम चव्हाण उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT