‘जलजीवन’ची ८२१ कामे अपूर्ण
जिल्ह्यातील चित्र; गटातटाचे राजकारण कारणीभूत
कुंडलिक पाटील : सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. ५ : जिल्ह्यात जलजीवन मिशन पाणी योजनेची ३९६ कामे पूर्ण झाली असून ८२१ कामे अपूर्ण आहेत. पाणी योजनेची कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत तालुका गटविकास अधिकारी यांनी सुनावणी घेतल्या होत्या. सुनावणीनंतर कंत्राटदार सक्रिय झाले असून ग्रामपंचायतींच्या मात्र आडकाठ्या असल्याचे चित्र आहे. गटातटाचे राजकारण योजनेवर फिरत असून कोट्यवधी रुपयांच्या योजना असूनही काही गावांत वाढीव वस्तीवर पिण्याचे पाण्याचे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत.
जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत १२७० गावांत योजना मंजूर झाल्या होत्या. यापैकी ३९६ योजना पूर्ण झाल्या असून ८२१ योजनांची कामे सुरू असली तरी या योजना अपूर्ण आहेत. तसेच जागेअभावी व विविध कारणांनी ११ ठिकाणी अद्याप कामे सुरू झालेली नाहीत, तर ५३ गावांमध्ये योजनेची वर्क ऑर्डर दिलेली नाही.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ज्या ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले अशा ग्रामपंचायतीच्या ठिकाणी गटाच्या राजकारणातून या योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करून घेण्यास आडकाठी आणली जात आहे. जिल्हा परिषद अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानंतर सर्व तालुक्यांच्या ठिकाणी गटविकास अधिकारी यांनी कंत्राटवर व ग्रामपंचायत, सरपंच, सदस्य यांच्या सुनावणी घेतल्या होत्या. यानंतर कंत्राटदार सक्रिय झाले आहेत. मात्र काही ठिकाणी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या आजही योजनेबाबत आडकाठी असल्याचे चित्र आहे. दरम्यान उन्हाळ्याच्या तोंडावर या योजना पूर्ण होऊन वाढीव वस्तीवर, टंचाई असलेल्या ठिकाणी पाणी मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कडक धोरण अवलंबावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
चौकट
तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतल्या. या सुनावणी झालेल्या गावांची यादी जिल्हा परिषदेला असणे क्रमप्राप्त होते. सुनावणीनंतर पुढे प्रश्न सुटले का, याची माहिती जिल्हा परिषदेला मिळू शकली नाही.
चौकट
जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन पाणी योजनेचे
काम सुरू असलेल्या कामांची टक्केवारी अशी,
शून्य ते पंचवीस टक्के ३७ योजना
२५ ते ५० टक्के १३३ योजना
५० ते ७५ टक्केपर्यंत २३५ योजना,
७५ ते ९९ टक्केपर्यंत ४०५ योजना
कोट
पावसामुळे योजनांची कामे थांबली होती. आता पावसाळ्यानंतर कामांना गती येईल. योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. २०२५ पर्यंत सर्व योजना पूर्ण होतील.
- अर्जुन गोळे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.