कोल्हापूर

श्रीराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कुडित्रे येथे कार्यक्रम

CD

05854

मुलींनी शारीरिक, मानसिक
स्वास्थ जपावे ः डॉ. मेघना चौगले

कुडित्रे, ता. ३ : ‘आधुनिकीकरणाच्या युगात तरुण पिढीमध्ये ताणतणावाचे वातावरण आहे. स्पर्धात्मक युगामध्ये टिकून राहायचे असल्यास मुलींनी बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपावे,’ असे प्रतिपादन डॉ. मेघना चौगले यांनी केले. त्या येथील श्रीराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘उमलते मन’ मार्गदर्शनप्रसंगी बोलत होत्या.
डॉ. मेघना चौगले म्हणाल्या, ‘‘सध्याच्या आधुनिक युगात एकत्र कुटुंबपद्धती मागे पडत आहे. यामुळे कुटुंबातील संवाद व कौटुंबिक एकजन्सीपणा यांचा ऱ्हास होत आहे. यावेळी कुमारावस्थेमध्ये असलेल्या मुलींना आपल्या वैयक्तिक समस्या स्पष्टपणे मांडता येत नाहीत. फास्ट फूडची चलती जास्त असल्याने मुलींच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत आहे. आरोग्यसंपन्न राहण्यासाठी मुलींनी सकस आहार, व्यायाम व योग साधना करणे काळाची गरज बनली आहे.’’ अध्यक्षस्थानावरून बोलताना अनु आसगावकर म्हणाल्या, ‘सांगरूळ शिक्षण संस्थेमार्फत शैक्षणिक मार्गदर्शनाबरोबर मुलींचा सर्वांगीण विकास, आरोग्य व इतर समस्यांचे निराकरण करण्यास प्राधान्य मिळते.’ उपप्राचार्य आर. डी. मोरे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय पी. व्ही. कदम यांनी सांगितला. एन. डी. पोवार यांनी सूत्रसंचालन, जे. जे. पाटील यांनी आभार मानले. यावेळी कॉलेजच्या विद्यार्थिनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT