कोल्हापूर

आमदार चंद्रदीप नरके पुरवणी लेख , सहकारातील ''दीपस्तंभ आम चंद्रदीप नरके'' ,धीरजकुमार माने : कार्यकारी संचालक कुंभी कारखाना

CD

सहकारातील ‘दीपस्तंभ’

स्व. डी.सी.नरके साहेब यांचा सहकाराचा वारसा पुढे नेत कुंभी कासारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके साहेब यांचे सहकार आणि सामाजिक क्षेत्रात उत्तुंग असे कार्य सुरू आहे. ते सहकारातील ''दीपस्तंभ आम चंद्रदीप नरके'' साहेब आहेत.
आमदार चंद्रदीप नरके यांनी करवीर ,पन्हाळा, गगनबावडा ,राधानगरी तालुक्यातील १७९ गावात कुंभी कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद असून कुंभी कारखान्याच्या माध्यमातून या सर्व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. कुंभी कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक सभासद, कर्मचारी ,तोडणी वाहतूकदार यांच्या उन्नतीसाठी सातत्याने आमदार नरके यांचे प्रयत्न केले आहेत. कुंभी कारखान्याच्या माध्यमातून कामगार ,अधिकारी कार्यक्षेत्रातील भूमिपुत्रांना न्याय देण्याची त्यांची भूमिका असते .यासाठी राज्यस्तरावर ,देश पातळीवर अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केले जाते. कारखान्याच्या माध्यमातून तांत्रिकदृष्ट्या कुशल मनुष्यबळ निर्माण झाले आहे. कुंभी कारखान्याला देश व राज्यपातळीवर अनेक पारितोषिक मिळाले आहेत.
सातत्याने प्रथम व द्वितीय साखर उतारा ठेवण्यात मोलाचे योगदान नरके यांचे आहे. यामुळे महाराष्ट्रात ‘कुंभी पॅटर्न’ नावारूपाला आला आहे. कारखान्यावर बगॅसनिर्मिती, वीजनिर्मिती, सहवीज, आसवनी असणे असे प्रकल्प वेळेत पूर्ण केले आहेत. पूर्वी प्रतिदिन १२५० ऊस गाळप क्षमता असणारा कारखाना ५५०० ऊस गाळप करत आहे. गतवेळी ऊस उत्पादक सभासदांनी गाळप क्षमता वाढवण्यास संमती दिली आहे. या प्रकल्पामुळे ऊसदर देण्यासाठी मदत होत आहे. शरीर सदृढतेसाठी कुंभी कारखान्यावर पैलवान युवराज पाटील यांच्या नावाने कुस्ती संकुल उभे केले आहे.येथे शेकडो मुले प्रशिक्षण, कुस्तीचे धडे गिरवत आहेत. ग्रामीण भागात नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभा करून नेमबाजांना प्रोत्साहन दिले आहे. अनेक वर्षे मानधन कुस्ती स्पर्धा घेतल्या जातात. अर्धंमॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबिर घेतले जाते. व्हीएसआय व राज्य साखर संघाच्या माध्यमातून कारखान्याचे व सहकाराचे अनेक प्रश्न त्यांनी मांडले. जनतेसाठी २४ तास उपलब्ध असणारे असे नेते म्हणजे आमदार चंद्रदीप नरके आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा...
- धीरजकुमार माने, कार्यकारी संचालक कुंभी कासारी सह., साखर कारखाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकन सैन्याकडून हॉर्मुझजवळील 'बंदर अब्बास'मध्ये हवाई हल्ले

Yashvi Patel: पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर, तरीही मारली बाजी! पाहा कसं पुण्याच्या यश्वी पटेलने नागपूरच्या खेळाडूला धूळ चारली!

Gluten Free Breakfast : ग्लूटेन-फ्री आणि टेस्टी! असा बनवा चविष्ट, पोटभर आणि फिटनेस फ्रेंडली ज्वारीचा उपमा!

भारत-नायजेरिया : नेहरूंपासून मोदींपर्यंत, दोन बलाढ्य देशांचे मैत्रीचे संबंध

Ambenali Ghat Accident: ‘ही दोस्‍ती तुटायची नाही’ म्‍हणतच जगाचा निरोप; आंबेनळी घाटात जीव गमावलेले पाचही जिवलग मित्र, आसगाव झाले सुन्न ..

SCROLL FOR NEXT