06145
वीटभट्टी मजुरांसाठी महामंडळ व्हावे
अनुराधा भोसले; दोनवडेत हक्क परिषद
कुडित्रे, ता. १८ : मराठवाडा विभागातून हंगामी स्थलांतरित वीटभट्टी व ऊसतोड मजूर कामानिमित्त स्थलांतरित झाले आहेत. संस्थेमार्फत त्यांच्यासाठी विविध उपक्रम घेतले जातात. वीटभट्टी मजुरांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करावे,’ अशी मागणी अवनि संस्थाध्यक्षा अनुराधा भोसले यांनी केली.
वाकरे, खुपिरे, कुडित्रे, साबळेवाडी, जाधववाडी, बावडा व तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टी ऊसतोड मजूर श्रमजीवी संघटना यांची दोनवडेत अवनि संस्थेमार्फत हक्क परिषद झाली. परिषदेमध्ये ६५ मजूर सहभागी झाले. अनुराधा भोसले यांनी स्थलांतरित मजुरांना पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालय, आरोग्य सुविधा अपूर्ण मिळत आहेत. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. कल्याणकारी मंडळाकरिता वीटभट्टी मजुरांनी एकत्रित लढा उभारावा, असे मार्गदर्शन अनुराधा भोसले यांनी केले. ऊसतोड कामगार कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करावी, ४ ते ६ वयोगटातील बालकांना स्थलांतरित ठिकाणी अंगणवाडीची सोय पोषण आहारासह करावी, स्थलांतरावेळी प्रत्येक बालकाला शिक्षण हमी कार्ड शिक्षण विभागाने द्यावे, ७ ते १४ वयोगटातील स्थलांतरित बालकांना शिक्षण हक्क कायद्यानुसार त्वरित शाळेत दाखल करून घ्यावे, वीटभट्टी व ऊसतोड मजुरांना किमान वेतन मिळावे असे विविध ठराव करण्यात आले. ठरावाचे वाचन ऊसतोड मजूर शामल डोईफोडे यांनी केले. संयोजन साताप्पा मोहिते, अमर कांबळे, रवी कुराडे, वैशाली कांबळे, अंजली कांबळे, जयश्री कांबळे, शिल्पा भास्कर, अश्विनी खोत, करुणा आठवले व अश्विनी शिंदे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.