कोल्हापूर

कुंभी-कासारी''ची हंगाम २०२५-२०२६ ची संपूर्ण एफआरपी आदा : आमदार चंद्रदीप नरके

CD

‘कुंभी-कासारी’ची एफआरपी आदा
कुडित्रे : येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याची हंगाम २०२५-२६ ची ‘एफआरपी‘ ३५६० रुपयेप्रमाणे ऊस बिले ऊस पुरवठाधारकांना दिल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली. कारखान्याने हंगाम २०२५-२६ मध्ये ४,८८,८७० टन ऊस गळीत करुन ६,१५,३५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा १२.५५ टक्के राहिला आहे. हंगाम सुरुवातीपासून ते १५ जानेवारीअखेर ऊस बिले दिली आहेत. उर्वरित १६ जानेवारी २०२६ ते हंगाम संपेपर्यंतच्या गळीतास आलेल्या १,६५,१५० टन उसाची बिलाची रक्कम ५८ कोटी ७९ लाख ३७ हजार रुपये ३१ मार्चला ऊस पुरवठाधारकांच्या बँक खात्यावर वर्ग केले. कारखान्याने एफआरपीप्रमाणे ऊस बिलाची रक्कम १७४ कोटी ०३ लाख ८० हजार रुपये दिली आहे. हंगाम २०२६-२७ साठी ऊसतोडणी वाहतूक करार सुरू केले आहेत. गळीताचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी शेतकऱ्यांनी उसाची नोंद करावी. पिकवलेला ऊस गळीतास पाठवावा; असे आवाहन चंद्रदीप नरके यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष राहुल खाडे, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक धिरजकुमार माने, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT