पुईखडीत अप्पा मॉर्निंग
ग्रुपची स्वच्छता, वृक्षसंवर्धन मोहीम
कुडित्रे : अप्पा मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पुईखडी येथे लावलेल्या झाडांचे संगोपन तसेच परिसर स्वच्छता मोहीम पार पडली. या उपक्रमामध्ये झाडांना आधार देणे, आळी स्वच्छ करणे तसेच परिसरातील कचरा निर्मूलन करण्यात आले. मोहिमेत ॲड. बाजीराव शेलार, डॉ. अरविंद देवकर, बंडोपंत वाडकर, गणपती मुळीक, मधुकर पाटील, दामोदर मोरे, अनिल कडोलकर, शिवाजी साळोखे, अविनाश रावळ, ॲड. विजय पाटील, संजय फराकटे, अमर ताडे, मोहन पाटील, उमेश जाधव, पुंडलिक बागडी, युवराज गायकवाड, सदाशिव कुंभार तसेच प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदविला. पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेचा संदेश देणारा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.