कोल्हापूर

कागल : कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वर्षभरात ५५ महिला आणि २९ पुरूष बेपत्ता

CD

वर्षात ८४ जण बेपत्ता
कागल पोलिस ठाणे कार्यक्षेत्र; ५५ महिला, २९ पुरुषांचा समावेश

नरेंद्र बोते

कागल, ता. ७ : कागल पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वर्षभरात ५५ महिला आणि २९ पुरूष बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. यामध्ये ४७ महिला आणि १९ पुरुषांचा समावेश आहे. यातील ८ महिला, १० पुरुष सापडलेले नाहीत. परतलेल्यातील १९ मुलींनी स्वखुशाने जीवनसाथी शोधून संसार थाटले आहेत. यातून वाद उद्‌भवून मारामारीच्या घटना घडत आहेत.
‘सोशल मीडियाचा अतिवापर व गतिमान जीवनशैलीमुळे पालकांचे पाल्याकडे होणारे दुर्लक्ष, पती-पत्नीमध्ये गैरसमजातून निर्माण होणारा संशय, सुसंवादाचा अभाव व व्यसनाधीनता या कारणांमुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. त्यातून घटस्फोट, पळून जाणे, आत्महत्या यांसारखे प्रकार घडू लागले आहेत. यातून दोन कुटुंबात वाद वाढून प्रकरण पोलिसात जात आहेत. यातून मारामारीच्या घटनाही घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी नवविवाहित जोडप्याला भर रस्त्यातचपोलिस ठाण्याजवळच मारहाण झाली. तरूणी १८ वर्ष वयाची पायरी ओलांडल्यानंतर बारावी परीक्षेदरम्यान मुली पळून जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीत तालुक्यातील २८ गावांचा समावेश आहे. कागलचाही समावेश आहे. वर्षभरात गावातून ५५ महिला आणि २९ पुरुष बेपत्ता झाल्याची नोंद आहे. महिलांमध्ये २५ मुली व ३० विवाहित महिलांचा समावेश आहे. यातील ४७ महिला आणि १९ पुरुष मिळाल्याच्या नोंदी आहेत तर ८ महिला आणि १० पुरूष अद्याप मिळून आलेले नाहीत. ज्या ४७ महिला परत आल्या आहेत, यातील १९ तरूण मुली आहेत. या मुलींनी पळून जात स्वतःच्या मर्जीने लग्न केले आहे. ८ महिला सापडलेल्या नाहीत. यामध्ये सहा तरूणी १९ ते २२ या वयोगटातील आहेत. तर उर्वरित दोन महिलापैकी एक २७ आणि दुसरी ४० वयाची आहे.
---------------
- १९ मुलींनी थाटले संसार
बेपत्ता झालेल्यापैकी १९ मुलीं परतल्या, पण त्यांनी स्वखुशाने आपला जीवनसाथी शोधून संसार थाटल्याचे तपासात आढळले, पण परतल्यानंतर अनकांनी पोलिस ठाण्यात त्याची कल्पनाही दिली नसल्याचे आढळले.
-------
कोट
शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींकडे पालकांनी लक्ष द्यावे. मित्र तसेच त्यांच्या दिनक्रमाविषयी माहिती घ्यावी. वयात येणाऱ्या पाल्यांशी मैत्रीचे नाते निभवावे. त्यांच्या भावभावना समजून घ्याव्यात. पाल्य चुकीच्या मार्गाने जात असेल तर वेळीच समज द्यावी. पाल्यांना गरजेइतक्याच वस्तू द्याव्यात. पालकांनी जागरूक असावे. मुलामुलींनीही पालकांचा विचार करावा.
- रविकांत गच्चे
उपनिरीक्षक, कागल पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT