कोल्हापूर

कागल : विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिध्दी पत्रक

CD

विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिध्दी पत्रक

कागल, ता. ८: कागल शहराच्या प्रारूप विकास आराखड्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्पुरती स्थगिती देऊन फेरचौकशीचे आदेश दिले आहेत. या विकास आराखड्याला स्थगिती मिळावी म्हणून आमदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांनी प्रयत्न केले. आमदार हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना पत्र लिहिले आहे तर खासदार श्री. मंडलिक यांनी आज त्यांची भेट घेतली आहे, अशी माहिती कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकावर चंद्रकांत गवळी, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, शहराध्यक्ष संजय चितारी, माजी नगराध्यक्ष नवल बोते, नगरसेवक प्रवीण काळबर, पक्षप्रतोद नितीन दिंडे यांच्या सह्या आहेत.
महिन्यापूर्वी कागल शहराचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाला होता. शेतकऱ्यांसह व्यापारी, व्यावसायिक अशा सर्वच स्तरातून या आराखड्याला विरोध झाला होता. तशा हरकतीही नगरपालिकेकडे आल्या आहेत. यासंदर्भाने आमदार हसन मुश्रीफ यांनी शाहू हॉलमध्ये सर्व संबंधितांची व्यापक बैठक घेतली आणि त्यांच्या भावना समजून घेतल्या. या आराखड्याला विरोध करून स्थगिती आणू, असा विश्वास आमदार श्री. मुश्रीफ यांनी दिला होता. तसेच, कृती समितीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भेटूनही निवेदन दिले होते. ही स्थगिती मिळून फेरचौकशी होवून शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबेल, अशी अपेक्षाही प्रसिध्दी पत्रकात व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT