कोल्हापूर

कागल : निषेध आंदोलन

CD

कागलला राष्ट्रवादी काँग्रेसचे निषेध आंदोलन
कागल ता. २६ : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा कागल शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आज निषेध करण्यात आला. गांधी यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे असल्याची ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली. येथील बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. यावेळी ‘लोकशाही बचाओ मोदी हटावो’च्या घोषणा दिल्या.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने म्हणाले, ‘निरव आणि ललित मोदी पळून गेलेत. त्यावर बोलल्यानंतर राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाली. राष्ट्रवादी काँग्रेस राहुल गांधी यांच्या पाठीशी आहे.’ कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा निषेध करत भाजपा आणि केंद्र शासनाविरोधात घोषणा दिल्या.यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. नवीद मुश्रीफ, नवल बोते, इरफान मुजावर, संजय ठाणेकर, संजय चितारी, सुनील माळी यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! 'या' दिवशी निकाल लागण्याची शक्यता, अपडेट्स समोर

राजू असल्याचं सांगत रियाजुद्दीनचं कांड, हिंदू मुलींना टार्गेट करत...; अमरावतीत आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस

Latest Marathi News Live Update : वन्यप्राणी पाणवठा गणनेसाठी काटेपूर्णा अभयारण्य सज्ज

डिजिटल पूजा खरंच पारंपरिक पूजेसारखीच प्रभावी असते का? वाचा तज्ज्ञ केलेला मोठा खुलासा

'माझ्या मुलाला मासिक पाळीबद्दल सांगितलंय...' गिरिजा ओकने सांगितला मुलाच्या शाळेतील किस्सा, म्हणाली...'कबिरने त्या मुलीसाठी...'

SCROLL FOR NEXT