कोल्हापूर

कागल : प्रारूप विकास आराखड्यात कोणावरही अन्याय होणार नाही

CD

कागलच्या विकास आराखड्यात
अन्याय होणार नाही याची दक्षता

सर्जेराव मुगडे ः नागरिकांच्या हरकतींवरील सुनावणी पूर्ण

कागल , ता. २७ : ‘कागल नगरपालिकेच्या प्रस्तावित विकास आराखड्याबाबत नागरिकांच्या हरकती तीन दिवस जाणून घेतल्या. नागरिकांनीही चांगला प्रतिसाद देत सहकार्य केले. लोक सहभागाशिवाय विकास आराखडा तयार करणे शक्य नाही. तसेच कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा अहवाल लवकरच मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे,’ अशी माहिती सेवानिवृत्त नगररचनाकार सर्जेराव मुगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कागल शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला असून नागरिकांच्या हरकती मागवण्यात आल्या होत्या. मंगळवार (ता. २३) ते गुरूवार (ता.२५) दरम्यान हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. सेवानिवृत्त नगररचनाकार सर्जेराव मुगडे, आर. पी. पाटील आणि डी. वाय. पाटील अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख इंद्रजीत जाधव आणि मुख्याधिकारी श्रीराम पवार यांच्या समितीने नागरिकांच्या हरकतींवर सुनावणी घेतली.
प्रस्तावित विकास आराखडा हा शहराच्या विकासाच्यादृष्टीने तयार केला जातो. पुढील २५ वर्षांचा विचार करून हा आराखडा तयार केला जातो. मात्र लोकसहभागाशिवाय हा आराखडा तयार करणे शक्य नाही. त्यामुळे ज्यांनी याला हरकती घेतल्या होत्या. त्या सर्वच नागरिकांचे म्हणणे आणि तक्रारी समितीच्या सदस्यांनी जाणून घेतल्याचे मुगडे यांनी सांगितले. काही नागरिकांच्या मिळकतींचा यामध्ये समावेश नाही. अशा नागरिकांनीही हरकती घेतल्या होत्या. तसेच काहींना शहराच्या विकासाच्यादृष्टीने समजावूनही सांगितले. काही तक्रारदार भूमिहिन होणार असल्याने त्यांच्या डोळ्यातून अश्रूही आल्याचे आम्ही पाहिले. त्यामुळे शहराचा विकास करताना कोणालाही बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच कोणावर अन्यायही होणार नाही याची दक्षता घेऊन अहवाल तयार करू, असेही मुगडे यांनी नमूद केले.
यावेळी नगर अभियंता सुनिल माळी, आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT