कोल्हापूर

कागल : मंडलिक कारखाना बिनविरोध, अधिकृत घोषणा १३ जून नंतर

CD

मंडलिक कारखाना बिनविरोध;
अधिकृत घोषणा मंगळवारनंतर

कागल, ता. ६ : लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. कालअखेर १८ उमेदवार बिनविरोध झाले होते. आज महिलांच्या दोन जागांसाठी दोन उमेदवार व इतर मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी एक अर्ज शिल्लक राहील्याने या उरलेल्या तिन्ही जागाही बिनविरोध झाल्या. एकूण २१ जागांसाठी २१ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, याबाबत औपचारिकता राहिली असून, अधिकृत घोषणा मंगळवारनंतर(ता. १३) केली जाणार आहे.
संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ५८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. १३ जून हा उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. कालअखेर १८ उमेदवार बिनविरोध झाले होते. इतर मागासवर्गीय गटात एका जागेसाठी नेताजी बळवंत पाटील यांचा एकच अर्ज व महिला गटात दोन जागांसाठी नंदिनीदेवी नंदकुमार घोरपडे व प्रतिभा भगवान पाटील यांचे दोनच अर्ज शिल्लक राहिल्याने हे तिन्ही उमेदवार बिनविरोध झाले. त्यामुळे आज २१ जागांसाठी २१ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले. त्यामुळे कारखान्याची ही निवडणूक बिनविरोध झाली.
याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा कागल राधानगरीचे प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता, १३जूननंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरच याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT