05214
कागलला मॉन्सूनपूर्व स्वच्छता
७० कर्मचाऱ्यांचा सहभाग; झोपडपट्टी व गावठाणमधील पूर्ण
कागल, ता. १६ : कागल नगरपरिषदेच्या वतीने शहरात मॉन्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभागाचे ७० कर्मचारी कार्यरत आहेत. दैनंदिन कामाबरोबरच मॉन्सूनपूर्व स्वच्छतेचे कामही केले जात आहे.
शहरातील झोपडपट्टी व गावठाणमधील स्वच्छता पूर्ण झाली आहे. मुख्य रस्त्यावरील बंदिस्त गटारी स्वच्छ केल्या आहेत. आता उपनगरात स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे. नालेसफाई, गटर स्वच्छता पूर्ण झाली आहे. कचऱ्याचा उठाव करण्याचे काम सुरू आहे. मनुष्यबाळाला न जमणाऱ्या ठिकाणची स्वच्छता जेसीबीद्वारे सुरू आहे. मॉन्सूनपूर्व स्वच्छतेसाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या रविवारच्या सुट्या रद्द केल्या आहेत. नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारींचे २४ तासांत निराकरण केले जात आहे. आपत्ती व्यवस्थापन कमिटी नेमली असून यासाठी १५ कर्मचाऱ्यांची निवड केरली आहे. मुख्याधिकारी श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे, स्वच्छता निरीक्षक दस्तगीर पखाली, बादल कांबळे हे कामावर देखरेख करत आहेत. पालिकेने संभाव्य पावसाळा लक्षात घेऊन शहरात चांगल्या उपाययोजना केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.