कोल्हापूर

कागल : जागतिक लोकसंख्या दिन एकोंडी येथे साजरा

CD

05304
कुटुंब नियोजनास बनवू आनंदाचा विकल्प
डॉ. फारुक देसाई, एकोंडीत लोकसंख्या दिन

कागल, ता. ११ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात कुटुंब नियोजनास आनंदाचा विकल्प बनवूया, असा संकल्प तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फारुक देसाई यांनी केले. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त एकोंडी (ता. कागल) येथील नागनाथ विद्यालय येथे जनजागरण फेरीचे आयोजन केले होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी लोकसंख्या नियंत्रणमबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
निरामय जीवनाचा आनंद घेण्यासाठी व बलशाली आणि निरोगी राष्ट्र उभारण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात आणणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.
११ ते २५ जुलैपर्यंत हा पंधरवडा कागल तालुक्यामध्ये गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे. या पंधरावड्यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया दर बुधवारी व गुरुवारी घेणार आहेत. उपकेंद्र स्तरावर कपल मिटिंग व लोकसंख्या नियंत्रणासाठी असणाऱ्या साधनांचे आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार होईल. कुटुंब नियोजनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्थरावर इंजेक्शन, गर्भनिरोधक गोळ्या, प्रसूतीनंतरची तांबी, आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या इ पिल्स, छाया साधने उपलब्ध आहेत. कार्यक्षेत्रातील गरजू लाभार्थ्यांनी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. यावेळी सिद्धनेर्लीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐनापुरे, आरोग्य सहायक नासीर नाईक, आरोग्य सहायक, सहायिका, आरोग्य सेवक, सेविका, आशा, समुदाय आरोग्य अधिकारी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हजर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

SCROLL FOR NEXT