05644
कागल ः तुडूंब भरलेला पाझर तलाव
...
कागलचा पाझर तलाव तुडुंब
कागल: परतीच्या मुसळधार पावसामुळे कागलचा पाझर तलाव तुडुंब भरला आहे. तलाव ओसंडून वाहू लागला असून अतिरिक्त पाणी सांडव्यातून बाहेर पडत आहे. कागल शहराला निसर्गाचे मोठे योगदान लाभले आहे. शहराच्या दक्षिणेला दुधगंगा नदी बारमाही वाहते. तर उत्तरेला जयसिंगराव तलाव आणि पाझर तलाव असे दोन तलाव शहरात आहेत. चालू वर्षी पाऊस कमी झाल्याने पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. मात्र शहर आणि परिसरात सलग सहा - सात दिवस पडणाऱ्या परतीच्या पावसाने पाझर तलाव तुडुंब भरल्याने तो ओसंडून वाहू लागला आहे. सकाळी तलावाचा सांडवा सुटला असून तलावातील अतिरिक्त पाणी सांडव्यातून बाहेर वाहू लागले आहे. चालू वर्षी प्रथमच पाझर तलावाचा सांडवा सुटल्याने अनेकांचे पाय तलावाकडे वळू लागले. हा पाझर तलाव पर्यटनासाठी विकसित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.