कोल्हापूर

कागल : श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा निमंत्रण व आनंदोत्सवाचा प्रसाद वाटप शुभारंभ

CD

06087
कागलः येथील नियोजित कार्यक्रमाचे निमंत्रण व आनंदोत्सवाचा प्रसाद वाटप प्रारंभ करताना पालकमंत्री हसन मुश्रीफ. शेजारी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, प्रकाश गाडेकर, चंद्रकांत गवळी, प्रविण काळबर आदी.
...
मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना
अयोध्या दर्शन घडविणार
पालकमंत्री मुश्रीफ ः कागलमध्ये आनंदोत्सवाचा प्रसाद वाटप प्रारंभ
कागल,ता.१५ : ‘गेल्या अनेक वर्षांपासूनची देशवासियांची भावना असलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर साकारले आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठापना व मंदिर लोकार्पण सोहळा साजरा होत आहे. याच दिवशी येथील गैबी चौकात भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे’, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या दर्शन घडविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अयोध्या येथील श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापना २२ जानेवारी रोजी होत आहे. या आनंदोत्सवानिमित्त मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने एक लाख कुटुंबांमध्ये आनंदोत्सवाचा प्रसाद वाटप प्रारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते येथील श्री राम मंदिरात झाला. यावेळी ते बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, ‘देशातील सर्वधर्मियांची धार्मिकस्थळे चांगली करण्याचा प्रयत्न केंद्र शासन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. कागल येथील श्रीराम मंदिर बांधण्यामध्ये माझे मोठे योगदान आहे. २२ जानेवारी रोजी देशातील १४० कोटी जनता हा सोहळा साजरा करणार आहे. अयोध्येतील हा सोहळा झाल्यानंतर मतदारसंघातील जे इच्छुक ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना मोफत अयोध्या दर्शन घडविणार आहे. २२ रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडेल. याच दिवशी कागलमध्ये गैबी चौकात भव्यदिव्य कार्यक्रम घेणार आहोत. टाळ मृदंगाच्या गजरात व भव्य आतिषबाजीने हा सोहळा साजरा करणार आहोत. या कार्यक्रमाची पत्रिका एक लाख कुटुंबांना देणार आहोत. यामध्ये श्री. राम मंदिराचा फोटो असलेली कापडी पिशवी, आनंदोत्सवाचा प्रसाद म्हणून अर्धा किलो साखर, लाडू आणि कागलमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका समाविष्ट आहे. याचबरोबर आपण सातशे देवालये बांधली आहेत याची माहिती पुस्तिका यामध्ये आहे.’
यावेळी ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, नवीद मुश्रीफ, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, संजय चितारी, नितीन दिंडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : OUT or NOT OUT? अभिषेक शर्माच्या झेलवरून वाद, SRH च्या ताफ्यात नाराजी; ब्लेसिंगने फिरवली मॅच

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

Pune News : शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी मिळकतकराची अट रद्द

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

Naigaon Crime : बापाचा मृतदेह दारातच सोडून नराधम मुलगा पळाला; मात्र, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

SCROLL FOR NEXT