पोलिसाच्या बतावणीने कागलला
लांबवले सव्वा लाखाचे दागिने
कागल, ता. ३० : पोलिस असल्याची बतावणी करत वृद्धाचे सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने लंपास करण्याचा प्रकार मौजे सांगाव (ता. कागल) येथील मराठी शाळेत जवळ घडला. याबाबतची फिर्याद आप्पासाहेब भाऊ पाटील (रा. मौजे सांगाव) यांनी कागल पोलिसात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, आप्पासाहेब पाटील मोटारसायकलवरून यळगूडला बंबासाठी लागणारे लाकूड आणण्यासाठी गेले होते. लाकडे घेतल्यानंतर पाटील यळगूडहून मौजे सांगावेतील राहत्या घराकडे जात होते. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास कसबा सांगाव येथून मौजे सांगावकडे जाणाऱ्या रोडवर मराठी शाळेच्या पुढे गजानन ट्रेडर्स दुकानाजवळ आले असता अनोळखीने पाटील यांना आपण पोलिस असल्याचे सांगितले व हातचालाखी करत पाटील यांच्या गळ्यातील १४ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व सात ग्रॅम वजनाची अंगठी काढून घेऊन पोबारा केला. त्या चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.