7320
कागल ः येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण करताना सिद्धनेर्ली येथील दलित बांधव.
........
राजर्षी शाहूंनी दिलेली
जमीन आम्हाला परत द्या
सिद्धनेर्ली येथील दलित बांधवांचे लाक्षणीय उपोषण
सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. ३० : राजर्षी शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील दलित समाजाला पाच एकर २७ गुंठे जमीन दिली होती. मात्र, ती जमीन समरजितसिंह घाटगे यांनी काढून घेतली आहे. ती परत मिळावी, या मागणीसाठी सिद्धनेर्ली येथील दलित बांधवांनी येथील तहसील कार्यालयासमोर लाक्षणीय उपोषण केले. यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, भारतात लोकशाहीचे राज्य आहे. ‘कसेल त्याची जमीन’ या कूळ कायद्याप्रमाणे संबंधित गट क्र. १४२० या जमिनीतील असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची व त्यांच्या वारसांची नावे त्वरित उताऱ्यावर लावावीत, या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयासमोर सिद्धनेर्ली येथील दलित बांधवांनी लक्षणीय उपोषण सुरू केले आहे. उपोषणास कृष्णात भोसले, विजय कुरणे, जयसिंग कांबळे, अजित कांबळे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय बसले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.