निवडणुकीच्या रणधुमाळीत
अनेकांना मिळाला रोजगार
हॉटेल, ढाबे फुल्ल; सिस्टीम, मंडप व्यावसायिकांना मागणी
सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. १७ : निवडणुकीच्या रणधुमाळीत दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून, हजारो हातांना काम मिळाले आहे. छोट्या व्यावसायिकांनाही रोजगार मिळाला आहे. दरम्यान, हॉटेल, ढाबे रात्री उशिरापर्यंत गर्दीने फुलल्याचे चित्र दिसून येत आहे. याचा परिणाम म्हणून सध्या शेतीकामासाठी मजू मिळेना झाले आहेत.
महिनाभरापासून सुरू असलेला दिवाळीचा फीवर आता कमी होऊ लागला आहे, तर दुसरीकडे निवडणुकीचे फटाके फुटत आहेत. सध्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होऊ लागली आहे. छोट्या-छोट्या घटकांतील लोकांना एकीकडे रोजगार मिळत असला तरी दुसरीकडे रोज काबाडकष्ट करणारे मजूर आता मजुरी करताना दिसत नाहीत. शेती कामासाठी मजूर मिळत नसल्याची सध्याची स्थिती आहे.
निवडणुकीमुळे सध्या मंडप, खुर्ची व साउंड सिस्टिमवाल्यांना मोठी मागणी आल्याने त्यांची आर्थिक उलाढाल होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. तसेच जेवणावळींना ऊत आला असून नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे.
मंडप व्यावसायिकांसह ऑटो रिक्षा, हौदा रिक्षा, डिझायनर्स, बॅनर, डिजिटल प्रिंटर्स, स्टीकर, फ्रेम्, मेकर्स, पॉम्पलेट, झेंडे बनवणारे त्याचबरोबर झेरॉक्स मशीनवाल्यांना आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही सुगीचे दिवस आले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराच्या सभा घेण्यासाठी मंडप खुर्चा, साऊंड सिस्टम आदींसह साहित्य लागते. त्यामुळे मंडप खुर्चावाल्यानांही भाव आला आहे. काही दिवसांपूर्वी हॉटेल व खानावळींच्या ठिकाणी तुरळक ग्राहक होते; पण निवडणुका ऐन बहरात आल्याने दुपारी व सायंकाळपर्यंत हॉटेल, ढाब्यावर फुल्ल सुरू असल्याचे पाहायास मिळत आहे.
...............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.