8053
कागल : आवास योजनेतून बांधण्यात आलेले घरकुल
..............
‘रमाई आवास’चे कागलमध्ये उचांकी काम
पाच वर्षांत ११४६ घरे मंजूर : ९०० हून अधिक घरांचे बांधकाम पूर्ण
नरेंद्र बोते ः सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. १८ : कागल शहरात रमाई आवास योजनेतून गेल्या पाच वर्षांत तब्बल ११४६ घरे मंजूर झाली आहेत. त्यापैकी ९०० हून अधिक घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या घरकुल योजनेमुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्धांसह समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिक कौलारू घरातून सिमेंट काँक्रिटच्या भक्कम घरात राहायला आले. त्यामुळे अनेकांचे राहणीमान बदलून गेले तसेच जीवनमान उंचावले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्धांसह समाजातील आर्थिक दुर्बल नागरिकांना घरे बांधण्यासाठी शासनाने रमाई आवास योजना सुरू केली आहे. स्वतःच्या ३३० चौरस फूट जागेत घर बांधण्यासाठी शासन लाभार्थ्याला दोन लाख ५० हजार रुपयांचे अनुदान देते. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागतो. कागल तालुक्यात या योजनेमुळे अनेक कुटुंबांना लाभ झाला आहे. तसाच लाभ कागल शहरातील नगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांनाही झाला आहे. या योजनेतील घरकुलांमुळे गोरगरीब लोक सिमेंट काँक्रिटच्या भक्कम घरात राहावयास आल्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावले आहे.
रमाई आवास योजना २०१२-१३ मध्ये सुरू झाली. सुरुवातीला ४५ लाभार्थ्यांनी घरासाठी अर्ज दाखल झाले. त्यांची छाननी करून याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवून मंजुरी घेतली होती. त्यावेळी मंजूर झालेल्या ४५ पैकी सर्व घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत.
या योजनेअंतर्गत गेल्या बारा वर्षांत ११४६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ९०० हून अधिक घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. त्यामध्ये लाभार्थ्यांची कुटुंबे राहायलाही गेली आहेत. उर्वरित घरांचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. योजनेमुळे दलित वस्तीचे रूपडे पालटले आहे. मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कागल शहरातील रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांचा टप्पा ११०० च्या पुढे गेला आहे.
.......
चौकट...
कागल पालिकेच्या माध्यमातून मंजूर घरकुले
सन २०१८-१९ ः १६४
सन २०१९-२० ः १९८
सन २०२०-२१ ः ७०
सन २०२१-२२ ः १४९
सन २०२२-२३ ः ४७
सन २०२३-२४ ः १०५
.........
चौकट.....
रमाई आवास घरकुल योजना मूळ बांधकाम विभागाची योजना आहे. परंतु, मागासवर्गीय वाड्यावस्त्यांशी आरोग्य विभागाचा आरोग्याच्या सोयी पुरविण्याच्या निमित्ताने थेट संपर्क येत असतो. त्यामुळे लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून योजनेचे महत्त्व पटवून देणे सोयीची झाले. या योजनेची आवश्यक ती कागदपत्रे जमा करून घेऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचे काम बांधकाम विभागाची मदत घेऊन आरोग्य विभागाकडे दिले आहे. त्यामुळे रमाई आवास योजनेत राज्यात उच्चांकी घरकुले बांधण्याचे काम कागलमध्ये झाले आहे. याससाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे मार्गदर्शन लाभले.
- नितीन कांबळे, आरोग्य निरीक्षक, कागल नगरपरिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.