कोल्हापूर

कागल : मेडिकल शॉपमध्ये धाडसी जबरी चोरी; मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार

CD

मेडिकलमधून गोळीच्या बहाण्याने
कागलला मंगळसूत्र हिसकावले

कागल : शहरातील अशोका हॉटेल परिसरात असलेल्या मेडिकल शॉपमध्ये दोन चोरट्यांनी जबरी चोरी करत महिलेच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी कागल पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनुजा अभिजीत साठे (वय ३३, रा. जयसिंगराव पार्क, कागल) यांचे महामार्गालगत सेवारस्त्यावर गिरनार नावाचे मेडिकल शॉप आहे. सायंकाळी आठला एक अनोळखी दुकानात आला. त्याने ॲलर्जीच्या गोळीची मागणी करण्याचा बहाणा केला. फिर्यादी औषध देत असतानाच त्याने अचानक गळ्यातील एक लाख ३० हजार रुपये किमतीचे १३ ग्रॅम वजनाचे मणीमंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले. संबंधित चोरटा दुकानाबाहेर मोटारसायकलवर थांबलेल्या साथीदाराकडे जाऊन दोघेही पसार झाले. दोघांचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून त्यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधलेला होता. एकाने पांढरा शर्ट व जीन्स पँट, तर दुसऱ्याने पांढरा शर्ट व गडद निळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रमेश तावरे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खान सर यांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबार, ८ ते १० राउंड फायर; सुरक्षा रक्षक जखमी, कुणी केला हल्ला?

US Iran Conflict : शांतता करार होणार नाही? इराण-अमेरिका संघर्ष पुन्हा पेटला; क्षेपणास्त्र हल्ल्यांनी खळबळ

Farmer Loan Waiver: कर्जमाफीवर शिक्कामोर्तब! ५५ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटींचा मिळणार लाभ; मात्र काय आहेत योजनेचे प्रमुख निकष-अटी

Satara Accident: उज्ज्वल भविष्याची स्वप्ने अधुरी! दुचाकी अपघातात शिरवळच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, कॉलेज प्रवेशाची माहिती घेऊन परतताना काळाचा घाला

आजचे राशिभविष्य - 03 जून 2026

SCROLL FOR NEXT