कोल्हापूर

कागल पालिकेतील कंत्राटी कामगारांची माहिती जाहीर करण्याची सेनेची मागणी

CD

कागल पालिकेतील कंत्राटी कामगारांची
माहिती जाहीर करण्याची सेनेची मागणी

कागल, ता. २१ : कागल नगरपरिषदेत विविध विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कामगारांची संख्या, त्यांना दिले जाणारे वेतन, कंत्राटदारांची नियुक्ती आणि कामगारांना मिळणाऱ्या शासकीय सुविधांची माहिती जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे, नगरपरिषदेत सध्या विविध विभागांत कंत्राटी पद्धतीने किती कामगार कार्यरत आहेत, त्यांची नावे व विभागनिहाय संख्या काय आहे, तसेच या कामगारांना दरमहा एकूण किती वेतन अथवा मानधन दिले जाते, याची माहिती द्यावी. नगरपरिषदेकडून किती विभागांसाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे, संबंधित कंत्राटदारांकडून कामगारांना शासनाच्या नियमानुसार ईएसआय, पीएफ, बोनस तसेच आवश्यक सुरक्षा साधने आदी सुविधा दिल्या जातात का? संबंधित कंत्राटदारांना कोणत्या वर्षापासून नगरपरिषदेकडील कामगारांचा ठेका देण्यात आला आहे. सर्व कंत्राटदारांची परवाने, निविदांच्या प्रती उपलब्ध करून द्याव्यात. सलग अकरा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कामगारांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करून, त्यांना सेवेत कायम करण्याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवावा. कामगारांच्या प्रश्नावर सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य कार्यवाही करावी; अन्यथा तीव्र आंदोलन करून न्यायालयात दाद मागू.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, तालुकाप्रमुख जयसिंग टिकले, शिवसेना शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अशोक पाटील, शहरप्रमुख अजित मोडेकर, कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT