कोल्हापूर

कोल्हापूर . .ब्राह्मण संघाच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रा ..

CD

04725, 04726
कोल्हापूर : भगवान परशुराम पालखीचे पुजन करताना करवीर पीठाचे शकराचार्य विद्यानृसिंह भारती. दुसऱ्या छायाचित्रात शोभायात्रेत सहभागी महिला.

भगवान परशुराम जन्मोत्सव, शोभायात्रा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : मराठी भाषेची महती सांगणारे संत ज्ञानेश्‍वर, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान परशुराम, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य प्रतिमा, अखंड मंत्रोच्चार, लेझीम पथक, टाळांचा नादघोष, अशा भक्तीपूर्ण वातावरणात आज शोभायात्रा निघाली. निमित्त होते, हिरकमहोत्सवी चित्पावन ब्राह्मण संघासह समस्त ब्राम्हण समाजातर्फे भगवान परशुराम, छत्रपती शिवाजी महाराज आणि बसवेश्वर जयंतीचे.
करवीर पीठ शंकराचार्य विद्यानृसिंहभारती यांच्या प्रमुख उपस्थितीत शोभायात्रेला प्रारंभ झाला. पारंपारिक वेशभूषेत समाजबांधव शोभायात्रेत सहभागी झाले. ब्राह्मण समाजातील विविध संघटनांनी या शोभायात्रेत सहभाग नोंदवला होता. समर्थ रामदास स्वामी, संत एकनाथ महाराज, गोंदवलेकर महाराज, क्रांतिकारक चाफेकर बंधू, रमाबई रानडे, झाशीची राणी, श्रीमंत माधवराव पेशवे, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आदींवर आधारित जिवंत देखावे शोभायात्रेत होते. त्याचबरोबर धनगरी ढोल, टाळकरी पथक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज रथ यांचाही शोभायात्रेत समावेश होता.
पेटाळा मैदान येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, अंबाबाई मंदिर, ताराबाई रोड, तटाकडील तालीम, अर्ध शिवाजी पुतळा, गांधी मैदान असा शोभायात्रेचा मार्ग होता. गांधी मैदानमार्गे ही शोभायात्रा पुन्हा पेटाळा येथे आली. भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा झाला.
या वेळी नंदकुमार मराठे, प्रसाद भिडे, ॲड. विवेक शुक्ल, दिलीप गुणे, शामराव जोशी, रामचंद्र टोपकर, सचिन जनवाडकर, विनीता आंबेकर, पूजा जोशी, संजय जोशी, केदार जोशी, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्यासह समाजातील विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची SIT सोबत बैठक

SCROLL FOR NEXT