कोल्हापूर

कंदलगाव ..केआयटीच्या १४ विद्यार्थ्यांची टाटा पॉवर-मुंबई या कंपनीमध्ये निवड ..

CD

‘केआयटी’च्या १४ विद्यार्थ्यांची निवड
कंदलगाव : केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (स्वायत्त) इलेक्ट्रिकल (विद्युत) विभागातील १४ विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील टाटा पॉवर-मुंबई या कंपनीमध्ये निवड झाली. देशातील विविध इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धेतून साहिल माळी, वेदिका जाधव, आदित्य पाटील, सायली सावंत, श्‍वेता सावंत, ऋतुजा माने, वेदांत सावंत, सतीश गोरखोडे, अथर्व सरनाईक, वैष्णवी रीतापुरे, गणेश कस्तुरे, प्रथमेश पवार, प्रज्ञा लटके आणि आदित्य जाधव या चौदा विद्यार्थ्यांची निवड टाटा पॉवर कंपनीने केलेली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी असून या काळामध्ये त्यांना सात लाखाचे पॅकेज कंपनीने घोषित केलेले आहे.
महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. अमित सरकार, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख डॉ.विलास बुगड़े, ट्रेनिंग प्लेसमेंटचे विभाग समन्वयक प्रा. संतोष मडिवाळ यांचे विद्यार्थ्यांना सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, कार्यकारी संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जींन्नी आणि संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Padole Nagpur Accident : काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; कारला ट्रकची धडक, थोडक्यात बचावले

Vidarbha News: पेट्रोल पंप मालकावर फौजदारी गुन्हा दाखल; सार्वजनिक सुरक्षेसाठी पेट्रोल पंप नियमांचे काटेकोर पालन आवश्यक

Latest Marathi News Live Update : राज्यावर पुन्हा अवकाळी संकट! वादळी पावसासह गारपिटीचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

Murtizapur-Akola News: पेट्रोल, डिझेल टंचाईच्या अफवेने पेट्रोल पंपावर रांगा; भरीत भर सकाळपासून तीन पेट्रोल पंप बंद; साठा येण्यास विलंबामुळे पंप बंदची माहिती

Rahul Gandhi:गुजरातमध्ये दलितांवरील अत्याचारात वाढ:राहुल गांधी, भाजप सरकारच्या कार्यकाळात तिरस्कार,भेदभावात वाढ!

SCROLL FOR NEXT