कोल्हापूर

कंदलगाव .झाडांच्या कमतरतेने रस्ते तापले उन्हाने.. पाचगाव,कंदलगाव,मोरेवाडीतील रस्त्यावर झाडांची संख्या कमी..

CD

07567

झाडांचा अभाव उन्हाचा प्रभाव
रस्ते तापले ः पाचगाव, कंदलगाव, मोरेवाडीत झाडांची संख्या कमी

कंदलगाव, ता. ४ : शहराला लागून असणाऱ्या पाचगाव, मोरेवाडीसह कंदलगाव या उपनगरांतील रस्त्यावर पूर्वी मोठ्या प्रमाणावर झाडे होती. रस्ता रुंदीकरण, केबल, पाईपलाईन खोदाईसह बाजूपट्टया विकासकामांत अनेकदा अडथळा ठरत असल्याने रस्त्यावरील झाडे तोडली. त्यामुळे या भागात रस्त्यावर उन्हाचा ताव जाणवत आहे.
शासकीय नियमानुसार एक झाड तोडल्यावर त्या बदल्यात पाच झाडे लावण्याचा नियम आहे. मात्र, या नियमाचे अनेक वर्षांपासून उल्लंघन होत असल्याने जिल्ह्यातील सर्रास मुख्य रस्त्यावरील सावली नष्ट झाल्याचे दिसत आहे. पाचगाव, मोरेवाडी व कंदलगाव उपनगरांतील गावांची स्थितीही अशीच आहे. पूर्वी रस्त्याच्या दुतर्फावर झाडांचे साम्राज्य होते. अलीकडे विकासकामांच्या धडाक्याने रस्ता रुंदीकरण, केबल व पाईपलाईन खोदाईसह बाजूपट्टया वाढविणे, या कामांमुळे अनेक ठिकाणी झाडे तोडली. मात्र ती लावण्याकडे दुर्लक्ष झाल्याने झाडांच्या कमतरतेने रस्ते उन्हाने तापत असल्याचे चित्र आहे. भौगोलिकदृष्ट्या उपनगरांचा विचार करता दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढल्याने नवीन कॉलनीत रस्त्यासाठी जेमतेम जागा सोडल्याने रस्ता करणे, गटारी व इतर कारणांचाही यावर परिणाम होत आहे. कॉलन्या विकसित होताना झाडांचा अडसर होत असल्याने ती तोडली जातात.

चौकट.

वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष
पाचगाव ते गिरगाव रस्त्यावर दीड वर्षापूर्वी सामाजिक वनीकरण विभागाने वृक्षारोपण केले होते. मात्र वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष झाल्याने त्याठिकाणी फक्त आधाराची काठीच राहिली आहे.

कोट.
07570
पाचगावपासून गिरगावपर्यंतच्या रस्त्यावर पूर्वी मोठ्या प्रमाणावर झाडे होती. रस्ता रुंदीकरणात झाडे तोडली गेली. दहा वर्षांपासून रस्त्यावर एकही झाडे लावलेले नाही. त्यामुळे गावकऱ्यांना दुपारी उन्हाचे चटके सोसत प्रवास करावा लागतो.
- संभाजी साळोखे, गिरगाव.

07569
कंदलगाव मुख्य रस्त्यावर सहा-सात वर्षांपूर्वी झाडे लावली. मात्र देखभाल व विकासकामांच्या खोदाईने झाडांची मोडतोड होऊन ती नष्ट झाली. पुन्हा वृक्षारोपण झाले नाही. रस्त्यावर झाडे नसल्याने विद्यार्थी व वाहनधारकांना उन्हातून प्रवास करावा लागतो.
- अमर किल्लेदार, कंदलगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT