कोल्हापूर

सायकलवरून ज्योत आणून शिवरायांना मानाचा मुजरा...

CD

07761, 07760
कोल्हापूर : शिवजयंतीनिमित्त ३९४ कि.मी. प्रवास करीत जनजागृतीचे संदेश देणारे राम कारंडे व जयदीप पाटील.


सायकलवरून ज्योत आणून शिवरायांना मानाचा मुजरा...
कोल्हापूरच्या सायकलपटूंचा अभिनव उपक्रम; कोल्हापूर ते शिवनेरी ३९४ कि.मी.चा प्रवास
सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. ११ : एकीकडे थोर पुरुषांची जयंती व स्थानिक कार्यकर्त्याचे वाढदिवस अशा वेळी साउंड सिस्टीम लावून शहराचे वातावरण बिघडवणारे तरुण आणि दुसरीकडे कोल्हापूर व परिसरात अनेक ध्येयवेडे असे आहेत की ते आपल्या उपक्रमातून जनजागृतीसह पर्यावरण बचावासाठी उपक्रमातून सामाजिक संदेश देत आहेत. असाच सामाजिक संदेश व छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीदिनी ३९४ कि.मी.चा सायकल प्रवास करून त्याद्वारे पर्यावरण बचावासाठी संदेश देत मानाचा मुजरा दिला.
बालाजी पार्क येथील राम कारंडे व पाचगाव येथील जयदीप पाटील असे या दोघा तरुणांचे नाव आहे. या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या ३९४ व्या जयंती दिवशी कोल्हापूर ते शिवनेरी व पुन्हा शिवनेरी ते कोल्हापूर असा प्रवास करीत एक अभिनव उपक्रम केला आहे.
सुमारे पाच दिवस हा प्रवास करताना त्यांनी पर्यावरण व पाणी बचतीचा संदेश दिला. संयुक्त रविवारपेठ सेवा भावी संस्थेचे हे कार्यकर्ते असून त्यांनी या पूर्वीही असे उपक्रम करून पाणी वाचवा, झाडे लावा यासह बेटी बचाव, असे संदेश देऊन आपला सायकल प्रवास पूर्ण केला आहे. यासाठी त्यांना ज्येष्ठ नागरिक, कुटुंबांतील सदस्याचे मार्गदर्शन लाभले आहे.
--------------
चौकट
एकीकडे पारंपरिक तर...
शहरातील काही मंडळेच जयंती व उत्सवाचे पवित्र जपत आहेत. शुक्रवारी शहरात एकीकडे शिवरायांचा जयजयकार करीत पारंपरिक शिवजयंती साजरी केली. त्याचबरोबर काही सायकलपटूंनी प्रवासातून पर्यावरण, पाणी बचतीचे संदेश दिले, तर दुसरीकडे मात्र साउंड सिस्टीमवर हिडीस नृत्य करणारी तरुणाई दिसली.
----------------
कोट
कोल्हापूर हे कलेचे माहेरघर आहे. या ठिकाणी सर्वच उत्सव व जयंती मोठ्या प्रमाणावर साजऱ्या होतात. मात्र, अलीकडे होणारा साउंड सिस्टीमच्या वापराने या उत्सवात बाधा येत आहे. तरुणांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करणे गरजेचे आहे.
- राम कारंडे, सायकलपटू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata News: चंद्रशेखरन यांचा U-Turn? पुन्हा Tata चेअरमनपदी निवड! निर्णय होताच शेअर्स 5% वाढले; नेमकं काय घडलं?

UPI MDR 2026 : अमेरिकेच्या दबावामुळे युपीआय वर एमडीआर? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Asian Games 2026 Cricket : पाकिस्तानला दुबळ्या थायलंडने रडवले, शेजारी २ चेंडू राखून कसेबसे जिंकले; चीन न खेळताच स्पर्धेबाहेर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

Latest Marathi News Update : आम्ही ECI च्या विवेकाधिकाराची जागा घेऊ शकत नाही - सुप्रीम कोर्टाचं महत्वाचं निरीक्षण

SCROLL FOR NEXT