कोल्हापूर

कंदलगाव .योगेश्वरी,महालक्ष्मी बँक कॉलनीत सांडपाणी रस्त्यावर.. स्थानिकांचे आरोग्य बिघडले..

CD

07768

योगेश्वरी, महालक्ष्मी बँक
कॉलनीत सांडपाणी रस्त्यावर

स्थानिकांचे आरोग्य बिघडले; आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

कंदलगाव, ता. १३ : योगेश्वरी कॉलनी व महालक्ष्मी बँक कॉलनी रस्त्यावर चार महिन्यांपासून सांडपाणी वाहत असल्याने स्थानिकांचे आरोग्य बिघडले आहे. संबंधित महापालिका आरोग्य विभागाने तत्काळ स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छता करावी; अन्यथा आंदोलनाचा इशारा रेखा कवठेकर, सुरज वैद्य, धोंडिराम बुरांडे, किरण जोशी, जयंत कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी यांनी दिला आहे.
पाचगाव-कोल्हापूर रस्त्यावरील रंगछाया हॉलनजीक योगेश्वरी कॉलनी व महालक्ष्मी बँक कॉलनीत सुमारे दीडशे कुटुंबांची वस्ती आहे. या गल्लीत चार महिन्यांपासून रंगछाया हॉल व सुपर बझार या दोन व्यावसायिकांचे सांडपाणी रस्त्यावर वाहत असून या पाण्यामुळे गल्लीत दलदल होऊन डासांचे प्रमाणही वाढले आहे. या सांडपाण्यातून खराब अन्नही वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. याबाबत आपणही स्वच्छतेबद्दल सातवेळा महापालिका आरोग्य विभागाला लेखी तक्रार देल्याचे रंगछाया हॉलचे रंगराव देवाळे यांनी सांगितले.

चौकट.
चोवीस तास वाहते सांडपाणी
गल्लीत गटारी नसतानाही काही व्यवसायिकांनी सांडपाणी सोडल्याने हे सांडपाणी रस्त्यावरून चोवीस तास वाहत असते. घरातून बाहेर पडताना या पाण्यातून प्रवास करावा लागतो. दुर्गंधीचा त्रास होत आहे.

कोट
07772
या गल्लीत गटारी नसल्याने सर्वाच्या दारासमोरून सांडपाणी वाहत आहे. दुर्गंधी व डासांचा त्रास आहे. लहान मुले आजारी पडली आहेत.
- नाना गवड

07771
चार महिन्यांपासून हा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा तक्रारी देऊनही दखल घेतली जात नाही. आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत.
- रवींद्र कवठेकर
07770
येथील व्यावसायिकांनी गटारी नसताना रस्त्यावर पाणी सोडले आहे. त्याचा त्रास दोन महिन्यांपासून सहन करीत आहोत. आजारपण वाढले आहे. दुर्गंधीचा त्रास होत आहे.
- ॲड. सुजनसिंह जाधव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Nanded Crime: डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणे भोवले! वाई बाजारच्या पूजा मेडिकल्स परवाना निलंबित; सहाय्यक आयुक्तांची कारवाई!

Success Story: मोलमजुरी करणाऱ्या आईचा मुलगा आयआयटीत; पारनेरच्या संतोष पागिरेंची गरुड झेप, लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले!

"फिटनेसच्या बाबतीत माझा रोल मॉडेल कुशल बद्रिके! देवदत्तने सांगितले ‘घबाडकुंड’ च्या सेटवरचे मजेशीर अनुभव

MI vs CSK: 'चेन्नई सुपर किंग्स नाही, तर मुंबई इंडियन्सच IPL मधील सर्वोत्तम संघ,कारण...' इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT