07838
आंबा लोणच्याचा दर होणार तिखट
उत्पादनात घट; वळीव, ढगाळ वातावरणाचा परिणाम
सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. २० : पावसाळा सुरू झाला की लोणच्याचा आंबा बाजारात येतो. परंतु यंदा वळीव व ढगाळ वातावरणामुळे लोणची आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आंबा महाग झाल्याने लोणचे करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
दरवर्षी ग्रामीण भागात मार्च एप्रिल व मे महिन्यात वाळवणीचे पदार्थ बनविण्यासाठी गृहिणींची लगबग असते. पहिला पाऊस पडल्यावर वर्षभर टिकणारे आंब्याचे लोणचेही बनवले जाते. यावर्षी अवकाळी पावसाचा तडाख्याने आंब्याचा मोहोर कमी लागला. त्यामुळे आंबा उत्पादनात घट झाली. जे काय आंब्याचे उत्पादन निघाले ते गावोगावीच खपल्याने उत्पादन मार्केटपर्यंत पोहोचू शकले नाही. लोणच्यासाठीचे चांगल्या आंब्याचे उत्पादन कमी झाले आहे. आंबा महाग झाल्याने चवदार स्वादिष्ट लोणचे महाग होण्याची लक्षणे आहेत.
मुंबई-पुण्यात नोकरीसाठी असणारी मंडळी शाळेला सुटी पडल्यानंतर गावाकडे येतात. शाळा सुरू झाली की पुन्हा ते मुंबई पुणे किंवा जिथे कामधंद्याला आहेत तिथे जात असतात. गावी आल्यानंतर वाळवणीचे पदार्थाबरोबर वर्षभर पुरेल इतके आंब्याचे लोणचे घेऊन जातात. परंतु यंदा अवकाळी पावसाने आंब्याचे मोहोर झडल्याने आंब्याचे उत्पादन कमी प्रमाणात निघालेले आहे. त्यामुळे यावर्षी आंबट लोणचे तिखट होणार असल्याचे चित्र दिसत आहे. करवीर तालुक्याच्या कंदलगाव, गिरगाव, कोगील, दऱ्याचे वडगाव, नंदगाव यासह ग्रामीण भागात डोंगरपट्टयात मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे आहेत. मात्र काही वर्षांत वृक्षतोड वाढल्याने ही झाडे कमी झाल्याचेही चित्र आहे.
चौकट.
ग्रामीण दर
शेकडा २०० रुपये
फोडणी २० रुपये डझन
शहरी दर
शेकडा ५६० रुपये (७० रु. डझन)
फोडणी - ३० रुपये डझन.
कोट.
07836
मागील महिन्यात ढगाळ वातावरण आणि वळीव पावसाने हजेरी लावल्याने कैरीची मोठ्या प्रमाणात गळती झाली आहे. याचा फटका आंब्याच्या हंगामाला बसला आहे. रायवळी, राती, लिटी अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या गावठी आंब्याला फटका बसला आहे.
- शिवाजी रणदिवे, लोणची आंबा उत्पादक, कंदलगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.