07840
पाचगाव - आर. के. नगर
रिंगरोड गटार काम रखडले
गटारीच्या खोदाईत हिरवेगार पाणी
कंदलगाव, ता. २१ : पाचगावच्या डॉ. आंबेडकर कमानीपासून मंडलिक बोअरिंगपर्यंतच्या परिसरातील हरी पार्क येथे गटारीचे पाणी तुंबत आहे. या गटारीतून थेट पाचगाव ओढ्यात पाणी सोडण्याच्या उद्देशाने हे गटारीचे काम सुरू केले. मात्र मागील महिन्यापासून हे काम रखडले आहे.
पाचगाव हद्दीतील पोस्टल कॉलनी परिसरात हरी पार्क येथे पावसाळ्यात पाणी तुंबत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे गटारीचे काम सुरू आहे. मात्र येथे दगड फुटत नसल्याचे कारण सांगत गेल्या महिन्यापासून हे काम रखडले आहे. सध्या येथे खोदाई केलेल्या गटारीत सांडपाणी साचल्याने हे पाणी हिरवेगार झाले आहे.या पाण्यातून दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढल्याने स्थानिकांचे आरोग्य बिघडले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक असल्याने नागरिकांची गर्दी असते. खासगी क्लासेस असल्याने विद्यार्थी संख्याही मोठी आहे. येथे गटारीसाठी केलेली खोदाई खोल आणि रुंदीची असल्याने अपघाताचाही शक्यता आहे.
चौकट.
कामात दिरंगाई
पावसाळ्यात तुंबणारे पाणी निचरा करण्यासाठी सुरू असलेले हे काम कठीण दगड लागल्याने चार ते पाच मशिनरी बदलून दोन महिन्यांपासून रखडले असून
किमान पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्ण होईल काय असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला.
कोट.
दोन महिन्यांपासून काम सुरू आहे. कामाला गती नाही. ठेकेदार मर्जीने काम करीत आहेत. माझा रोजचा प्रवासाचा रस्ता असल्याने येथे वाहतूक कोंडी व वाहनधारकांची कसरत होत आहे. कामाकडे दुर्लक्ष झाले आहे.
- स्वप्नील पाटील, प्रवासी
दोन महिन्यांपासून दारे-खिडक्या बंद करून बसावे लागते. गटारीसाठी खोदलेल्या चरीत पाणी साचल्याने दुर्गंधी आणि डासांचा त्रास होत आहे.
- मुस्कान नदाफ, महिला
येथे कठीण दगड लागला आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेऊ.
- परशुराम नंदिवाले, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.