कोल्हापूर

क्रीडा संकुल रस्त्यावर चेंबर फुटल्याने धोका

CD

07922
कोल्हापूर : मंगळवार पेठेतील पद्मावती मंदिराच्या मागील रस्त्यावर चेंबर फुटल्याने धोका निर्माण झाला आहे. (प्रकाश पाटील : सकाळ छायाचित्र सेवा)

क्रीडा संकुल रस्त्यावर
चेंबर फुटल्याने धोका
दोन आठवडे ''जैसे थे'' स्थिती
सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. २ : पद्मावती मंदिरापासून जुन्या एनसीसी ऑफिसकडे जाणाऱ्या क्रीडा संकुल रस्त्यावर गटारीचे चेंबर फुटल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सुमारे दोन आठवड्यांपासून ही स्थिती असूनही संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवासी व स्थानिक नागरिकांनी वाहनधारकांची काळजी घेऊन या चेंबरमध्ये झाडांच्या फांद्या लावल्या आहेत. या रस्त्यावर कळंबा, संभाजीनगर, गजानन महाराजनगर या परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. तसेच याठिकाणी जवळच क्रीडा संकुल असल्याने खेळाडू मुला-मुलींची रात्री उशिरापर्यंत ये-जा सुरू असते. अशावेळी या फुटलेल्या चेंबरमुळे अपघात घडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
----------------
07921
कोट
या रस्त्यावर पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत तरुण खेळाडूंसह प्रवाशांची वर्दळ असते. या ठिकाणी गटारी खोल आहेत. रस्त्यावरील गटारीचा चेंबर फुटल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.
- युवराज लोखंडे, नागरिक
-----------------
कोट
या रस्त्यावरील गटारींच्या तीन चेंबरबाबत विभागीय कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. दोन दिवसांत चेंबर दुरुस्ती करून घेऊ.
- विनोद नाईक, आरोग्य निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: सकाळी ५ वाजता ग्राउंड अन् रात्रीपर्यंत अभ्यास; वैशालीने जिद्दीने मिळवली कारागृह पोलिसाची वर्दी, शेतकरी कुटुंबातील लेकीची प्रेरणादायी भरारी..

Gokul Election: आमचे उमेदवार कोल्हापुरात ठरतात; सतेज पाटील

Ladki Bahin Yojana September Installment Date : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? समोर आली संभाव्य तारीख

LPG Cylinder Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर LPG सिलिंडरचे काय झाले? सणासुदीआधी नवे दर जाहीर; आता कितीला मिळतोय?

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीची रणनीती ठरली! मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जागावाटपाचा तिढा सुटला; राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा, तर भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7

SCROLL FOR NEXT