कोल्हापूर

कंदलगाव .केआयटीच्या प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेबाबत मोफत मार्गदर्शन.. केशवराव भोसले नाट्यगृह येथे संपन्न होणार..

CD

केआयटीच्या प्रथम वर्ष इंजिनिअरिंग
प्रवेश प्रक्रियेबाबत उद्या मार्गदर्शन

कंदलगाव, ता. ८ : केआयटी कॉलेजतर्फे सोमवारी (ता. १०) ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी व प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया-२०२४'' विषयावर मार्गदर्शन होणार आहे. कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृहात दु. ४ वा. होणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. वनरोट्टी म्हणाले, ‘‘केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालय ४१ वर्षाची उज्ज्वल परंपरा असणारे तसेच एन.बी.ए. नॅकबरोबरच ''एम्पॉवर्ड ऑटोनॉमी''चा दर्जा असलेले दर्जेदार कॉलेज आहे. अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया थोडी गुंतागुंतीची आहे. प्रवेश प्रक्रियेतील एकूण टप्प्यांवर झालेली छोटी चूक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे नुकसान ठरू शकते. याचे गांभीर्य ओळखूनच केआयटी विद्यार्थी व पालकांसाठी हा कार्यक्रम करते. कार्यक्रमात अभियांत्रिकीच्या विविध विभागांतील करिअरच्या संधी, प्रवेश प्रक्रियेतील टप्पे, महत्त्वाची कागदपत्रे, शिष्यवृत्ती, आरक्षण, शासकीय नियमांबाबत मार्गदर्शन केले जाईल. हा कार्यक्रम पालक, विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः विनामूल्य आहे.
कार्यक्रमात सहभाग घेऊन पालकांनी इंजिनिअरिंगची प्रवेशप्रक्रिया, अर्ज प्रक्रिया, ऑप्शन फॉर्म भरतानाचा गोंधळ टाळावा, असे आवाहन डॉ. वनरोट्टी यांनी केले. यावेळी प्रवेश प्रक्रियाप्रमुख डॉ. महेश शिंदे, सचिव दीपक चौगुले, प्रा. अमित वैद्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Veer Sugar Factory: किसनवीर साखर कारखान्यात कामगारांचा उद्रेक, अनेक वर्षांपासून पगार नाही; मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील विरोधात संताप

IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

SCROLL FOR NEXT