कोल्हापूर

कंदलगाव.सरदेसाई हायस्कूल मध्ये पोषण माह उपक्रम उत्साहात साजरा.

CD

सरदेसाई हायस्कूलमध्ये
पोषण माह उपक्रम
कंदलगाव : विद्यावर्धिनी शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित कोपार्डेकर शाळा समूहातील श्रीमती आनंदीबाई नारायणराव सरदेसाई हायस्कूलमध्ये पोषण माह उपक्रम उत्साहात झाला. उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ॲनिमिया आजाराची माहिती मोरे मानेनगर आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविका गीता कांबळे व मीनाक्षी कांबळे यांनी दिली. विद्यार्थ्यांना फॉलिक ऍसिड व लोहयुक्त गोळ्यांचे वाटपही केले. विज्ञान शिक्षिका आरती कोपार्डेकर यांनी जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुण्याची योग्य पद्धत कशी असावी, संतुलित आहाराचे महत्त्व विशद केले. उपक्रमांतर्गत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा संतुलित आहाराचे सेवन - आजची गरज, पौष्टिक आहार, सुदृढ शरीर या विषयांवर घेण्यात आल्या. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन संस्कार विद्यार्थ्यांत रुजण्यासाठी इको क्लबचे विद्यार्थी सदस्यांनी ‘एक पेड मा के नाम’ उपक्रम स्थानिक प्रजातीचे रोप स्वतः आईकरिता लावून तिच्यासोबत सेल्फी काढणे असा उपक्रम राबविला. उपक्रमासाठी शिक्षकेतर कर्मचारी मधुकर पोवार व एस. एस. भोसले यांचे सहकार्य लाभले. यावेळी मुख्याध्यापक मिलींद कोपार्डेकर, शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs JPN : मोठा वाद! श्रेयस अय्यर भांडला, अम्पायरने निर्णय बदलला; तसं नसतं झालं तर जिंकला असता जपान, नेमकं काय घडलं ?

आता फक्त Call-SMSचा प्लान, कंपन्यांना बंधनकारक; रिचार्ज होणार स्वस्त, TRAIचा मोठा निर्णय

Mark Wood Retirement: दोन वर्ल्ड कप जिंकणाऱ्या स्टार खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा; ३६ व्या वर्षी घेतला मोठा निर्णय

दुष्काळाची अधिसूचना शनिवारपर्यंत, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT