कोल्हापूर

कंदलगाव.गांधीजींची मुल्ये शालेय जीवनापासूनच आचरणात आणावी. कोपार्डेकर:

CD

‘संस्कार रुजवूया स्वच्छतेचे’
उपक्रम कोपार्डेकर शाळेतर्फे

कंदलगाव, ता. ९ ः ‘‘सत्य, अहिंसा व त्याग ही गांधीजींची मूल्ये प्रत्यक्ष शालेय जीवनापासूनच आचरणात आणून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणावेत;’’ असे प्रतिपादन सचिव व मुख्याध्यापक मिलिंद कोपार्डेकर यांनी व्यक्त केले.
विद्यावर्धिनी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचालित कोपार्डेकर शाळा समूहातील आनंदीबाई नारायणराव सरदेसाई हायस्कूल व विद्यामंदिर शाहूपुरी कोल्हापूर आणि ग्रामपंचायत कळंबा यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी विचार व स्वच्छता मूल्य विद्यार्थ्यांच्यात रुजवण्याच्या दृष्टीने ‘संस्कार रुजवूया स्वच्छतेचे’ उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी कळंबा सरपंच सुमन गुरव व सामाजिक कार्यकर्ते विश्वास गुरव, उपसरपंच व शाळेचे माजी विद्यार्थी विकास पोवार याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी लक्ष्मी मुतनाळ व पृथ्वीराज किल्लेदार यांनी केले. सार्थक नागावकर व व्ही. एस. पाटील यांनी आभार मानले. एम. बी. डावरे, अजित व्हनाळकर, एस. एस. पाटील, एस. एस. भोसले, बी. डी. भूसनर, आरती कोपार्डेकर, पांडुरंग नायकवडे, मधुकर पोवार व दत्तू चौधरी यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

LPG Supply in India : युद्धामुळे LPG चा पुरवठ्याचं संकट; इंटरनेटवरही होणार परिणाम?

IPL 2026 Schedule Announced : आयपीएलच्या १९व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर; RCB vs SRH यांच्यात सलामी; पहिल्या २० सामन्यांचं टाईमटेबल

Pune crime cctv: पुणं हादरलं! मित्राची थट्टा केली म्हणून आला राग, सपासप वार करत केला खून! सीसीटीव्ही व्हायरल

'मुरांबा' मालिकेत मोठा ट्विस्ट; अक्षय आणि रमाच्या आयुष्यात 'ती' पुन्हा येणार; प्रेक्षक मात्र संतापले

SCROLL FOR NEXT