9094
पेठवडगाव ः येथे पक्षी सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांसोबत उपस्थित मान्यवर व पालक.
.............
जयवर्धन, विवेक, श्रेयस
पेठवडगावात पक्षी सप्ताह ः विद्यार्थ्यांनी रेखाटली विविध पक्ष्यांची चित्रे
सकाळ वृत्तसेवा
पेठवडगाव, ता. १८ : येथील निसर्गप्रेमी मित्र संस्था आणि महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला. सप्ताहाचे औचित्य साधून येथील महालक्ष्मी तलाव येथे पहिली ती दहावी गटात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. आपापल्या गटात जयवर्धन पाटील, विवेक कुंभार, श्रेयस घारसे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेत पेठवडगाव परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेत दुर्मीळ स्वर्गीय नर्तक, गिधाड, घुबड तसेच पाणथळ परिसरातील पक्ष्यांची चित्रे रेखाटली. तत्पूर्वी निसर्गरम्य तलाव परिसरात पक्षी निरीक्षण करून ई-बर्ड संकेतस्थळावर नोंद करण्यात आली होती. विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांनीही पक्षी निरीक्षणाचा आनंद लुटला.
निसर्ग अभ्यासक डॉ. सुधीर कुंभार यांनी विद्यार्थी, पालकांना पक्ष्यांचे मानवी जीवनातील महत्त्व, सध्याच्या समस्या आणि त्याचे होणारे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. विजेत्या विद्यार्थ्याना रोख बक्षिसे, तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पुस्तके भेट देण्यात आली.
पेठवडगावसह आसपासच्या खेड्यांतील तसेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक गावांतील विद्यार्थ्यानी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या उपक्रमात निसर्गप्रेमी मित्रचे सर्व सदस्य, लायन्स क्लबचे सर्जेराव पाटील, अरविंद पवार, डॉ अजित चव्हाण, डॉ सुनील चौगुले, डॉ. वनिता चौगुले, जयश्री पाटील, वडगाव पालिकेचे शिवराज जाधव उपस्थित होते. या उपक्रमास संतोष लडगे, विशाल पाटील, विजय भोसले, उदय ढवळे यांचे सहकार्य लाभले.
..........
चौकट...
चित्रकला स्पर्धेचा निकाल .
बाल गट (पहिली ते चौथी) ः अनुक्रमे जयवर्धन पाटील, कुशल गोंजरी, शार्दुल यादव. उत्तेजनार्थ ः सान्वी हुकेरी.
कुमार गट (पाचवी ते सातवी) ः अनुक्रमे विवेक कुंभार, वीरा शेटे, विहान दुबोले. उत्तेजनार्थ ः निर्जला चौधरी.
मोठा गट (आठवी ते दहावी) ः अनुक्रमे श्रेयस घारसे, गौरांगी पाटील, सई मोरे. उत्तेजनार्थ ः कारुण्य बुरुड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.