कोल्हापूर

कंदलगाव.पालापाचोळ्याचे मल्चिंग करून रोपट्यांचे संगोपन

CD

10065

पालापाचोळ्याचे मल्चिंग
करून रोपट्यांचे संगोपन

वृक्षमित्रांचा दैनंदिन उपक्रम

कंदलगाव, ता. ६ : शहर व परिसरात पाच वर्षांपासून रिकाम्या जागेत वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करणाऱ्या संस्था व वृक्ष मित्रांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या संस्था व वृक्ष मित्रांकडून दैनंदिन वेळेतील काही तास लावलेल्या वनीकरणात घालवून संवर्धनाची सेवा सुरू आहे.
सुनील पाच्छापुरे, प्रा. प्रफुल्ल खेडकर व मन्सूर गोवावाला या तिघांनी वृक्षारोपण संगोपनासाठी शहरातील टाकाळा भागातून पालापाचोळा गोळा करून तो त्यांनी लावलेल्या रोपट्यांचे उन्हापासून संरक्षण म्हणून मल्चिंग करण्यासाठी वापरतात. हा उपक्रम दोन-तीन वर्षापासून सुरू असून यावर्षीही या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.
जनजागृतीतून आवाहनही
माळावरील वृक्षारोपणातील रोपांना मल्चिंग करण्यासाठी पालापाचोळ्याची गरज असते. हा पालापाचोळा शहर परिसरातून मोठ्या प्रमाणावर मिळतो. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून त्याद्वारे जनजागृती करण्यात येते. जनजागृतीतून नागरिकांना त्यांच्या अंगणातील पालापाचोळा एकत्र करण्यासाठी आवाहन केले जाते. गोळा झालेला पालापाचोळा रिक्षातून किंवा दुचाकीवर घेऊन तो झाडांच्या बुंध्यांशी घातला जातो.

कोट
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून माळावरील रोपट्यांना पाण्याची कमतरता भासत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी रोपांच्या बुंध्यापाशी पालापाचोळ्याचे मल्चिंग केले जाते. त्यातून बऱ्यापैकी पाण्याची बचतही होते. रोपांना असलेली पाण्याची गरजही भागते.
- प्रा. प्रफुल्ल खेडकर,वृक्षमित्र.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात लाच घेताना महसूल सहाय्यक अधिकारी रंगेहात पकडला

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT