10102
जायंटस् ग्रुप नूतन
कार्यकारिणीचा शपथविधी
काेल्हापूर, ता. १० : जायंटस् ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटी या सामाजिक संस्थेच्या नूतन अध्यक्षा शुभदा कामत व त्यांच्या कार्यकारिणीचा १८ वा शपथविधी व पदग्रहण सोहळा उद्यमनगर येथील जायंटस् सभागृहात झाला. मावळत्या अध्यक्षा माधुरी भाेसले-पाटील यांनी स्वागत केले. कार्यक्रमास उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
युनिट क्र. ९ चे संचालक सुरेश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शपथविधी झाला. यावेळी जायंटस् रंकाळा चौपाटीच्या संस्थापिका व फेडरेशन २ क च्या अधिकारी बबीता जाधव यांनी जायंटस् ची माहिती दिली. अनिता काळे यांनी सूत्रसंचालन व सुनंदा मोरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास जायंटस् वेलफेअर फांडेशनचे अध्यक्ष प्रशांत माळी, डॉ. राजकुमार पोळ, मंगला कुलकर्णी, रामदास रेवणकर, मंदाकिनी साखरे, प्रकाश वर्णे, सुरेखा गुप्ते, शारदा शेट्टी, प्रा. तानाजी पाटील, प्रा. अरविंद देशपांडे, कमल पाटील, पृथ्वीराज पाटील, वैशाली कदम, शशिकांत कुलकर्णी, शुभांगी तावरे, रितेश माने, वनिता माने, राजेंद्र मकाेटे, अक्षय थाेरवत यांच्यासह विविध ग्रुपचे पदाधिकारी, सभासद व जायंटस् परिवारचे सदस्य उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.