12902
सनशाइन चॅम्पियनशिपचा
गांधीनगर यंगस्टार मानकरी
रोटरॅक्ट क्लब ऑफ केआयटीतर्फे कंदलगावात आयोजन
कंदलगाव, ता. १४ : रोटरॅक्ट क्लब ऑफ केआयटी सनशाईन यांच्यातर्फे श्री महालक्ष्मी टर्फ कंदलगाव मैदानावर क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचा अंतिम सामना गांधीनगर यंगस्टर्स विरुद्ध ग्रीन एवोल्युशन फिटनेस यांच्यात झाला. एवोल्युशन फिटनेस संघाने प्रथम फलंदाजी करत पाच षटकांत ४७ धावा केल्या, गांधीनगर यंगस्टर संघाने ३.५ षटकांत ४८ धावा करून सनशाइन चॅम्पियनशिपचा मानकरी ठरला.
तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन केआयटी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगचे प्रा. डॉ. संदीप देसाई यांनी केले. यावेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ केआयटी सनशाईनचे प्रेसिडेंट यशोदत्त पाटणकर, सचिव वैष्णवी कडावकर, व्हॉइस प्रेसिडेंट रेणू भोसले, अनिश शिंदे, स्पोर्ट्स चेअरपर्सन आशीष माटुंगे, मैत्रेय सरदेसाई, आदित्य सरनोबत, शुभम पाटील, प्रतीक्षा जगताप, शिवानी भोसले याचबरोबर रोटरॅक्ट क्लब ऑफ केआयटी सनशाईनची टीम आणि सहभागी खेळाडू उपस्थित होते. स्पर्धेमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून आदित्य पाटील, बेस्ट गोलंदाज यश सनगर, बेस्ट फलंदाज आदित्य लुलानी यांचा सत्कार करण्यात आला. हॉटेल धडेल, टॅब ज्वेलर्स, आरडी, डिकॅथलॉन, श्री महालक्ष्मी टर्फचे श्रीयश घोरपडे यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.