खोची-नरंदे रस्ता दुरुस्तीसाठी निधी
ग्रामस्थांमधून समाधान ः एक कोटी ८८ लाख रुपये मंजूर
सकाळ वृत्तसेवा
खोची, ता. २८ ः खोची ते नरंदे या पाच किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी माजी आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून १ कोटी ८८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांची कसरत होत होती.
तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी रहदारीचा आणि सोयीचा मार्ग असल्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडे केली होती, अशी माहिती हातकणंगले तालुका भाजप अध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी दिली.
श्री. महाडिक यांनी जुलैमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांशी रस्त्याच्या निधीबाबत पत्रव्यवहार केला होता. दुरुस्तीअभावी रस्त्यावरील वाहतूक धोकादायक सुरू असून, अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे, ही बाब महाडिक यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत खोची ते नरंदे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तब्बल १ कोटी ८८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच यासंबंधीची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.