कोल्हापूर

कळंबा शेती गटांतर्गत ११३६७ हेक्टरवर खरीप

CD

१७९४
कळंबा : खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर बैल जोडीच्या सहायाने मशागतीची कामे करताना शेतकरी.

कळंबा शेती गटांतर्गत
११३६७ हेक्टरवर खरीप
संजय दाभाडे : सकाळ वृत्तसेवा
कळंबा, ता. १ : कळंबा शेती गटांतर्गत चाळीसगावामध्ये ११३६७ हेक्टर क्षेत्रामध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे शेती अवजारे, बी-बियाणे, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेती केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. तसेच मशागतीच्या कामांना जोर आला आहे.
कळंबा, कात्यांयनी, पाचगाव, मोरेवाडी, कणेरी, कणेरीवाडी, वाडी पीर, हणबरवाडी, जैताळ, वडकशिवाले, दिंडनेरली, चुये, कावणे, नंदवाळ, दर्याचे वडगाव, गिरगाव तामगाव यासह परिसरातील चाळीसगांवामध्ये खरीप पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. यंदाच्या खरीप हंगामात ११३६७ क्षेत्रात भात १५०५ हेक्टर, भुईमूग १२२६ हेक्टर, सोयाबीन २२९७ हेक्टर, भाजीपाला १४३ हेक्टर, ऊस ६१८१, तूर, उडीद, मूग व इतर कडधान्य १५ हेक्टर आदी पिकांची लागवड करण्यात येणार आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सोयाबीन २५ हेक्टर, भुईमूग १० हेक्टर, नाचणी, वरई या पिकांची बियाणे देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
------------
कोट
पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी करावी. तसेच अधिक उत्पन्न घेण्यासाठीसंकरित बियाणांची निवड करावी. त्याचबरोबर बीज प्रक्रिया करून बियाणांची पेरणी करावी. यासाठीकृषी विभागाकडून मार्गदर्शन केले जाईल.
- नामदेव शिवाजी गिरीगोसावी, कृषी सहाय्यक, कळंबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT