कोल्हापूर

कळंब्यातील कोल्हापुरी बंधारे कोरडे

CD

94683
कळंब्यातील ११ बंधारे कोरडेच
पावसाअभावी परिस्थिती; शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे

सकाळ वृत्तसेवा

कळंबा, ता. ३ ः जून संपून जुलै महिना सुरू झाला आहे तरीही अनियमित पाऊस पडत आहे. ओढ्या-नाल्यातील पावसाच्या पाण्याचा प्रवाह अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे शेतीला वरदान ठरणारे व नवसंजीवनी देणारे कळंब्यातील ११ कोल्हापुरी बंधारे ऐन पावसाळ्यात कोरडे पडल्याचे दिसत आहेत. दरम्यान; महिन्याभरात पडलेला पाऊस शेतीला पूरक आहे; परंतु कूपनलिका, विहिरीतील पाणीसाठा अद्याप नगण्यच असून दमदार पर्जन्यवृष्टीची गरज आहे.
‘पाणी आडवा पाणी जिरवा’ धोरणातून कळंबा कात्यायनी परिसरात पावसाळ्यातील वाहून वाया जाणारे पाणी बंधाऱ्याद्वारे अडवून व जमिनीत मुरवून त्याचा शेतीसाठी उपयोग केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे क्षेत्र ओलिताखाली आले आहे. तिथे बारमाही विविध पिके घेतली जातात. त्यामुळे हे बंधारे शेतीला वरदान ठरले आहेत. येथे परिसरात शाहूकालीन बंधारा आहे. चुना व घडीव दगडी बांधकामात बंधाऱ्याची बांधणी आहे. १५ हून अधिक पाणी साठवणुकीचे गाळे आहेत. शेजारी शंभर फूट खोलीची विहीर आहे. या बंधाऱ्यांमध्ये पावसाळ्यात सहा टीसीएम पाणीसाठा होतो; मात्र पावसाच्या अभावामुळे बंधारा अद्याप कोरडा आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून मोठ्या ओढ्या-नाल्याच्या पात्राशेजारी ११ बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे. त्यामध्ये सहा सिमेंट नाला बंधारे बांधले आहेत. मातीचे पाच बंधारे बांधले आहेत. त्यामध्ये पावसाळ्यात सत्तर टीसीएम पाणीसाठा होत असतो. प्रत्येक पावसाळ्यातील हे चित्र आहे. यंदा मात्र पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे कात्यायनी डोंगर-कपारीतून उगम पावणारे अनेक ओढ्या-नाल्यांचे पात्र कोरडेच आहे. त्याचा कोल्हापुरी बंधाऱ्यातील साठ्यावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे.

चौकट..
बंधाऱ्यांत पाणीसाठा महत्त्वाचा
कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होते. विहिरी, कूपनलिका यांच्यातील पाणीसाठ्यात सतत वाढ होत राहते. रमाही पाण्याच्या उपलब्धतेमुळे कळंब्यातील बागायती क्षेत्र ओलिताखाली आले आहे. शेतीचे उत्पन्न वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा झाला आहे. त्यामुळे बंधाऱ्यांमध्ये पावसाळ्यात पाणीसाठा होणे महत्त्वाचे आहे.

कोट
शेतीला संरक्षित पाणीसाठा म्हणून कोल्हापुरी बंधाऱ्याकडे पाहिले जाते. पावसाळ्यात हे बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर वर्षभर शेतीला चांगला फायदा होतो. विहिरी व कूपनलिका यांच्यातील पाणीसाठाही या बंधाऱ्यांमुळे चांगला राहतो.
- तानाजी पाटील ;कृषी सहाय्यक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT