कोल्हापूर

सख्ख्या भावाने केला भावाचा खून

CD

पाचगावात धाकट्या भावाचा खून
हल्लेखोर मोठा भाऊ ताब्यात; आर्थिक वादातून कृत्य

सकाळ वृत्तसेवा
कळंबा, ता.२० ः पाचगाव (ता. करवीर) येथील पोवार कॉलनीत घरगुती वादातून आज सायंकाळी मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावाचा निर्घृण खून केला. त्याने त्याच्या अंगावर दुचाकी ढकलून दिली. दुचाकी खाली दोन्ही पाय सापडलेल्या भावावर त्याने चेनव्हीलवरील पंख्याने डोक्यावर एका पाठोपाठ घाव घातले. यात सागर जयसिंग कुंभार (वय ३५, रा. पोवार कॉलनी, मूळगाव घरपण ता.पन्हाळा) जागीच ठार झाला. करवीर पोलिसांनी त्याचा मोठा भाऊ संशयित वैभव (४०) याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः सागर व वैभव विवाहित आहेत. दोघेही आई, पत्नी व दोन मुलांसमवेत पोवार कॉलनीत २५ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. वडील सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये नोकरीला होते. त्यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर वैभवला नोकरी मिळाली आहे; मात्र तो दारूच्या आहारी गेला होता. त्यामुळे आर्थिक चणचण व सतत कुटुंबीयांबरोबर किरकोळ कारणावरून भांडण करत होता. दरम्यान, सागरने वडिलांच्या निधनानंतर कुटुंबीयांचा उदरनिर्वाचा खर्च स्वतः सांभाळला होता. लग्न कार्यासाठी व घरगुती कामासाठी बाहेरून कर्ज घेतले होते. त्यामुळे दोघांमध्ये त्यातून सतत वाद होत होता. मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास या वादाचे पर्यवसन मारामारीत झाले. मद्यप्राशन करून आलेल्या वैभवने घरी झोपलेल्या सागरला उठवून बाहेर आणले व अंगणात लावलेली दुचाकी त्याच्या अंगावर ढकलून त्याला खाली पाडले. त्यामुळे सागरचे दोन्ही पाय दुचाकी खाली सापडले. त्यानंतर वैभवने दुचाकीच्या चेनव्हीलवर असणारा पंखा काढून त्याच्या डोक्यावर व तोंडावर मारायला सुरुवात केली. यावेळी वेदनेने सागरने किंकाळ्या मारल्या; मात्र आठ ते दहा वर्मी घाव लागल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.
ही माहिती मिळताच करवीर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सागरच्या अंगावरील दुचाकी बाजूला करून त्याला रुग्णवाहिकेमधून सीपीआरमध्ये नेले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीर उपविभागीय अधिकारी सुजित कुमार क्षीसागर, निरीक्षक किशोर शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली. न्यायवैद्यक पथकाने घटनास्थळी येत सागरच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले. करवीर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटना पाहणाऱ्यांचा जबाब नोंदवला.

चौकट
मदतीला येणाऱ्यांना धमकावून हुसकावले
सागरच्या किंकाळ्या ऐकून शेजारी धावले. त्यांनी जखमी सागरला रुग्णालयात नेण्यासाठी रिक्षा बोलाविली; पण वैभवने त्या सर्वांना तेथून धमकी देत हुसकावले. तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्यानंतर त्याने घरातील चादर आणून सागरच्या अंगावर झाकून ठेवली व तेथेच बसून राहिला. त्यामुळे अर्धा तासाहून अधिक काळ सागर गंभीर अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

दुचाकी जप्त
सागर कुंभार याच्या डोक्यात दुचाकीचा पंखा मारल्याने रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या. घटनास्थळी रक्ताचे थारोळे पडले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून दुचाकी व सागरच्या डोक्यात मारलेला पंखा जप्त केला.

कर्ज फेडण्यावरून वाद
सागरने वडिलांच्या निधनानंतर मिळेल त्या रोजगारांमधून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला होता. दोघांचे लग्नकार्य त्याने स्वतः पुढे होऊन केले होते. त्यामुळे कर्ज झाले होते. हे कर्ज फेडण्यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होता.
-----------------
02242 - सागर कुंभार - मृत
02244 ः पाचगाव ः येथील पोवार कॉलनीतील घटनास्थळी मंगळवारी सायंकाळी झालेली गर्दी.

०००००००००००००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice-President Election : देशाचे १७ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज मतदान; NDAचे राधाकृष्णन अन् INDIA चे रेड्डी यांच्यात लढत

Sachin Tendulkar : BCCIच्या अध्यक्षपदासाठी सचिन तेंडुलकर अनुत्सुक? महत्त्वाची अपडेट समोर...नेमकं काय घडतंय?

'Gen Z'समोर झुकलं नेपाळ सरकार, २० मृत्यू अन् गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर बंदी हटवली

Minister Jayakumar Gore: ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे; मराठा समाजाला आरक्षण देताना मुख्यमंत्र्यांनी दक्षता घेतली

Paneer Moong Dal Appe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा पनीर मुग डाळ अप्पे, लगेच नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT