कोल्हापूर

कळंबा तलावाची जैवविविधता धोक्यात

CD

02294, 02293, 02295

कळंबा तलावातील जलसाठा प्रदूषित
सांडपाण्यामुळे मासे मृत्युमुखी; तवंग अन्‌ दुर्गंधीही

संजय दाभाडे : सकाळ वृत्तसेवा

कळंबा, ता. ३० : कळंबा तलावाच्या पाणलोट क्षेत्राचा शासनाने नागरी रहिवास झोनमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे परिसरात बिल्डर्सनी मोठ्या प्रमाणात शेतीचे प्लॉट पाडले आहेत. मात्र विस्तारणारी नागरी वस्ती, हॉटेल व उद्योग व्यवसायांचे निर्गत होणारे तैलमिश्रित व मैलामिश्रित सांडपाण्याचे व्यवस्थापन नसल्यामुळे कळंबा तलावात ओढ्या नाल्याद्वारे सरळ मिसळत आहे. त्यामुळे जलसाठ्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मासे मृत्युमुखी पडत असून जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पाण्यावर हिरवट तैलरंग पसरला असून दुर्गंधी सुटली आहे.
कळंबा तलावाचे एकशे दहा एकर पाणलोट क्षेत्र आहे. प्रदूषणाची झळ पोहोचू नये म्हणून १९७२ पासून कोल्हापूर, इचलकरंजी प्रादेशिक उद्यानांतर्गत क्षेत्र राखीव ठेवले आहे. मात्र शासनस्तरावर व प्राधिकरणाने परिसरामध्ये साठ एकरपेक्षा जास्त शेती क्षेत्रामध्ये रहिवासी झोन टाकला आहे. त्यामुळे येथे नागरी वस्ती, मंगल कार्यालय, हॉटेल व्यवसाय, राईस मिलसह अनेक उद्योग वाढत आहेत. मात्र सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प व स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे येथील सांडपाणी सरळ तलावात मिसळत आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नव्याने साठलेला नैसर्गिक जलसाठा प्रदूषित झाला असून जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले. पाळीव जनावरे व नागरी वहिवाटीमुळे तलावाचे काठ निर्माल्य व दलदलीने भरले आहे.

चौकट
कडक कारवाईची गरज
निम्म्या शहरासह कळंबा गावाला तलावातून बारमाही पाणीपुरवठा होतो. कळंबा ग्रामपंचायत व कोल्हापूर महापालिकेने मिसळणारे सांडपाणी थांबवण्यासाठी तातडीने तोडगा काढावा. अन्यथा साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. बेकायदा बांधलेली घरे व उद्योग, व्यवसायांवर कडक कारवाईची गरज आहे.

ांचौकट..
जलस्त्रोतही भरले कचऱ्याने
कळंबा तलावाचे जलस्त्रोत म्हणून ओळखले जाणारे अनेक ओढे-नाले टाकाऊ खाद्यपदार्थ, निर्माल्य, खरमाती, घन, जैविक, प्लास्टिक कचरा, रुग्णांचे कपडे, अंथरूण याने भरून गेली आहेत. हे सगळे पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाद्वारे तलावात मिसळत आहे. त्यामुळे तलावाला प्रदूषणाचा फास घट्ट होत आहे.

कोट
मानवी हस्तक्षेपामुळे कळंबा तलावाच्या निसर्ग सौंदर्याला नख लागले आहे. नागरी वस्ती, हॉटेल व्यवसायामधील मैला व रसायनमिश्रित सांडपाणी तलावात मिसळत असल्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढले आहे. जलचरांना धोका निर्माण झाल्याने तलावाचे अस्तित्व धोक्यात आल्याचे दिसत आहे.
- अनिल चौगुले, निसर्गमित्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT