कोल्हापूर

कळंबा कारागृह नजीक जलवाहिनीला गळती

CD

02312

कळंबा कारागृहानजीक जलवाहिनीला गळती
कळंबा, ता. ५ : पुईखडीतील शुद्धजल केंद्रातून उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर पाणी योजनेतील जलवाहिनीला कळंबा कारागृह नजीक मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे शुद्ध केलेला लाखो लिटर जलसाठा रस्त्यावर वाहून वाया जात आहे.
दरम्यान येथील शुद्ध जल केंद्रामध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत आहे. येथील जलवाहिनींना अनेक ठिकाणी गळती लागत असल्यामुळे उपनगरामध्ये पाण्याचा ठणठणाट सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी कूपनलिका व विकतचा टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. काळम्मावाडी थेट पाईपलाईन, कळंबा तलाव, शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडीमधील जलशुद्धीकरण केंद्रामधून लाखो लिटर पाणी उपसा करूनही नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
पुईखडीतून आपटेनगर, कळंबा रिंग रोड, कळंबा कारागृह मार्गे शिंगणापूर योजनेतून भूमिगत जलवाहिनी टाकलेली आहे. या जलवाहिनीमधून कळंबा कारागृह प्रभाग, आयटीआय परिसर येथील अनेक नगरांना व कॉलनींना या जलवाहिनीमधून पाणीपुरवठा होतो. मात्र कारागृह ते संभाजीनगरपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. गॅस पाईप पुरवठा, विविध कंपन्यांच्या केबल टाकणे यासह अनेक कारणामुळे या रस्त्याची खोदाई केली आहे. त्यामुळे जलवाहिनींना अनेकदा जेसीबीचा धक्का लागत असतो. तसेच कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गाला हा रस्ता जोडून येत असल्यामुळे अवजड व प्रवासी वाहनांची सतत या रस्त्यावरून वर्दळ सुरु असते.तसेच पाणीपुरवठ्याचा दाब व पाईप जीर्ण झाल्यामुळे जलवाहिन्यांना गळती लागून शुद्ध केलेला लाखो लिटर जलसाठा वाया जात आहे. त्यामध्ये कळंबा रिंग रोड,बापूरामनगर,दत्तोबा शिंदे नगर या ठिकाणी जलवाहिनींना अनेक ठिकाणी गळती लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhurandhar 2 Trailer: रहमान डकैत मेला… आता लियारीचा नवा बादशाह कोण? ‘धुरंधर २’ ट्रेलरमध्ये रणवीर सिंगचा धडाकेबाज इशारा!

T20 World Cup: भारतीय संघाने अहमदाबादमधील हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली, पण का? बॅड लक की आणखी काही?

Latest Marathi News Live Update : टेंडर वादातून नगरसेवकाला पिस्तुलाचा धाक; जीवे मारण्याची धमकी, राहात्यात खळबळ

Sairaj Patil UPSC Success : इंग्रजीचं टेन्शन विसरा! कराडच्या पठ्ठ्यानं मराठीतून शिकून यूपीएससीत मारली बाजी; 545 वी रँक मिळवत झाला IPS

Nitin Gadkari : चार महामार्गांचे लवकरच भूमिपूजन; नितीन गडकरी यांची माहिती

SCROLL FOR NEXT