02432
कळंब्यात लाखो लिटर पाणी वाया
कारागृहाजवळ जलवाहिनीला भगदाड; महामार्गाला तळ्याचे स्वरूप
सकाळ वृत्तसेवा
कळंबा, ता. ७ : उपनगरांना शिंगणापूर योजनेतील जलवाहिनीद्वारे काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतून पाणीपुरवठा होत आहे. मात्र या जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. विकासकामांमुळे रस्ते खोदाई करताना यंत्राचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटून गळती लागत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामध्ये कळंबा कारागृहांनजीक जलवाहिनीला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे दररोज गळतीद्वारे शुद्ध केलेला लाखो लिटर जलसाठा रस्त्यावर वाहून वाया जात आहे. जलवाहिनीतील पाण्याचा विसर्ग प्रचंड असल्यामुळे कोल्हापूर-गारगोटी राज्य महामार्गावर पाणी साचून तळ्याचे स्वरूप येत आहे.
पुईखडी येथील शुद्ध जलकेंद्रामधून उपनगरासह शहरांला पाणीपुरवठा करण्यासाठी शिंगणापूर योजनेतून भूमिगत जलवाहिनी टाकलेल्या आहेत. यामधील अनेक जलवाहिनी जीर्ण आहेत. विकासकाम व भूमिगत अनेक कंपन्यांच्या केबल टाकण्यासाठी रस्त्यांची खोदाई केली जात आहे. रस्ते खोदाईसाठी जेसीबी व अन्य अवजड यंत्राचा वापर केला जातो. या यंत्राचा धक्का जलवाहिनीला लागल्यामुळे व पाण्याच्या उच्च दाबामुळे जलवाहिनींना अनेक ठिकाणी गळती लागत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शुद्ध केलेला लाखो लिटर जलसाठा रस्त्यावर व गटारीत वाहून वाया जात आहे. अपुरे मनुष्यबळ व नियोजनाचा अभाव असल्यामुळे शहरासह उपनगराच्या पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे. वेळेत बिले भरूनही नागरिकांना वारंवार पाणी समस्येला सामोरे जावे लागत असल्यामुळे महापालिका पाणीपुरवठा विभागाविरोधात नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाहणी करून सर्व ठिकाणची जलवाहिनीची गळती काढावी, अशी मागणी होत आहे.
चौकट
गळती असलेली ठिकाणे
कळंबा रिंग रोड, सुर्वेनगर, कळंबा साई मंदिर चौक, साळोखेनगर, संभाजीनगर, निर्माण चौक, देवकर पाणंद, तपोवन परिसर यासह उपनगरातील अनेक ठिकाणी जलवाहिनींना गळती लागल्याचे दिसत आहे.
चौकट..
दहा एमएलडीहून अधिक शुद्ध पाण्याची नासाडी
काळम्मावाडी थेट पाईपलाईन, शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी येथील शुद्ध जल उपसा केंद्राद्वारे २५ कोटी लिटरहून अधिक पाण्याचा उपसा केला जात आहे. शहरासह उपनगरातील नागरिकांच्या गरजेपेक्षा हा पाणी उपसा जास्त आहे. पाणीपुरवठा नियोजनाचा अभाव, अपुरे मनुष्यबळ व जलवाहिनीच्या गळतीमुळे यामधील दहा एमएलडीपेक्षा जास्त पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शहरास उपनगरातील अनेक भागांत पाण्याचा नियमित ठणठणाट दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.