कोल्हापूर

मालेत दोन गटात मारामारी दोघे जखमी : कोडोली पोलीसात परस्पर विरोधी फिर्यादी सह बारा जनांना अटक

CD

मुलीला पळवून नेणाऱ्याशी मैत्री
ाकेल्याने दोन गटांत मारामारी

कोडोली ता. ३ : माले (ता. पन्हाळा) येथे तीन वर्षांपूर्वी मुलीला पळवून नेलेल्या मुलाशी मैत्री ठेवली या रागातून दोन गटांत झालेल्या मारामारीत दोघे जखमी झाले. याबाबत तेराजणांवर कोडोली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी दोन्ही गटांच्या १२ जणांना अटक करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, भूषण तामगांवकर याने जमदाडे यांच्या घरातील मुलीबरोबर तीन वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न केले हॊते. शुभम पाटील हा भूषणचा मित्र. त्यामुळे जमदाडे कुटुंबीय त्याच्यावर चिडून असतात. यातून दोन्ही गटांत आज वाद होऊन काठी, लाथाबुक्क्या व लोखंडी कड्याने मारहाण झाल्याने शुभम पाटील व अजिक्य पाटील जखमी झाले. शुभम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रवीराज जमदाडे, पृथ्वीराज जमदाडे, साहील जमदाडे, रोहित चौगुले, अजिंक्य पाटील, संकेत जमदाडे (सर्व रा. माले ता. पन्हाळा) या सहाजणांवर गुन्हा नोंद झालाा. अजिंक्य विश्वनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभिजीत पाटील, विश्वजीत पाटील, शुभम पाटील, भारत पाटील, विनोदकुमार पाटील, विठठल उर्फ सोन्याभाऊ पाटील, भूषण तामगांवकर (सर्व रा. माले ता. पन्हाळा) या सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना पन्हाळा न्यायालयात हजर केले असता ७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग व हावलदार माने करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संजू सॅमसनने इतिहास रचला, १९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; असा पराक्रम करणारा जगातला पहिला खेळाडू

Lagnanantar Hoilach Prem : विंटेज कार, पारंपरिक गाणी आणि चाहत्यांची गर्दी; स्टार प्रवाह मालिकेचा लग्न ट्रॅक कलाकारांसाठी ठरला ऐतिहासिक

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरातील 100 हून अधिक पर्यटक दुबईत अडकले

Ladki Bahin Yojana: जानेवारीनंतर आता फेब्रुवारीचा हप्ताही लांबणीवर, लाडक्या बहिणींना कधी मिळणार १५००? महिलांमध्ये नाराजी

Malegaon News : वीज कंपनीचा हलगर्जीपणा की तांत्रिक बिघाड?; उच्चदाब वाहिनीमुळे माती आणि खडक वितळले

SCROLL FOR NEXT