03676
कोडोलीत आग, १५ लाखांची हानी
शॉर्टसर्किटने घटना; दोन दुकानांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवाे
कोडोली ता. २६ : येथील मुख्य बाजारपेठेतील दोन दुकानांना शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दोन दुकाने व त्यातील साहित्य जळाल्याने सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोडोली प्रमुख मार्गावरील आयसीसी बँकेच्या शेजारी अवधूत चाळके यांचे प्रियंका फॅशन सेंटर व लेडीज कलेक्शन दुकान यालाच लागून सागर कापरे यांचे सागर गिफ्ट हाऊस स्टेशनरीचे दुकान आहे. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान अवधूत चाळके यांच्या दुकानाला अचानक शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत दुकानातील साहित्य व नव्याने केलेले फर्निचर आधी साहित्य या आगीत जळून खाक झाले. यावेळी रस्त्यावरून ये जा करणाऱ्या लोकांना चाळके यांच्या दुकानातून आगीच्या ज्वाला व प्रचंड धुराचे लोट बाहेर पडताना निदर्शनास आले. लोकांनी आरडाओरडा केल्याने घटनास्थळी गावातील लोकांनी धाव घेतली व ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीचा एकच डोंब झाल्याने शेजारील सागर गिफ्ट हाऊस स्टेशनरी दुकानाला आग लागली. यावेळी उपस्थित काही तरुणांनी जीवाची पर्वा न करता दुकानाच्या लोखंडी शर्टचे कुलुप तोडून दुकानात प्रवेश केला. व धाडसाने दुकानातील काही साहित्य बाहेर काढले परंतु बघता बघता या दुकानातील वह्या पुस्तके गिफ्ट साहित्य फर्निचर आदी साहित्य या आगीच्या बक्षस्थानी पडले. आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून लोकांनी बोलविलेल्या वारणा साखर कारखान्याच्या अग्निशामकच्या जवानांनी दुकानांमध्ये पाण्याचा मारा केल्याने ही आग पूर्णपणे आटोक्यात आल्याने शेजारील दुकाने या आगीपासून बचावले. व पुढील अनर्थ टाळला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.